This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
झाल्या पाण्डू उपवने॑वृती केतकी त्या फुलोनी ।
खोपे लक्षावधि विरैचिले ग्रामवृक्षीं खगांनीं ॥ ३२ ॥
झाले काळे पिळुनि सुफलें श्याम जंबूवँनान्त ।
प्रस्थानीं उत्सुकहि, जलदा, हंस झाले तयांत ॥
मूलश्लोक.
 
तेषां दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीं ।
गत्वा सद्यः फलमविफलं कामुकत्वस्य लब्धा ॥
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यस्मात् ।
सभ्रूभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मि ॥ २४ ॥
 
भाषान्तर.
 
त्यांची आहे विदित विदिशाँ राजधानी तियेतें ।
भेटोनीया रतिमुख-रस प्राप्त होईल तूतें ॥
मोठें नामी, मधुर, चलही वेत्रवत्यंबु, वेळें ।
काँहीं, प्याया मुखसम तुला भामिनीच्या मिळेल ।॥३३॥
मूलश्लोक.
 
नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो- ।
स्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः ॥
यः पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणा- ।
मुद्दामानि प्रथयति शिलावेश्मभियवनानि ॥ २५ ॥
 
भाषान्तर.
 
तेथोनीया जवळिं वसतो शैल नीचाख्य एक ।
घ्यावा त्याच्यावरि बसुनिया त्वां विसावा क्षणैक ॥
 
१. ही भूतभूतकालवाचक विशेषणें आहेत. त्यांची विशेष्यें अनु-
क्रमें ' उपवनवृती, ' ' खोपे, ' 'जंबूवनान्त, ' व 'हंस' हीं होत.
२. पिवळ्या. ३. बागांची कुंपणे. ४. जांभळीची झाडें आहेत ज्यांत
असे वनप्रदेश. ५. जाण्याविषयीं. ६. दशार्ण देशांत. ७. दशार्णाच्या
राजधानीचें नांव. हल्ली हिला मेलसा असें म्हणतात. ही माळव्यांत
वेत्रवती नदीच्या कांठी आहे. ८. संभोगाच्या सुखाचा रस. ९. वेत्र-
वतीचें पाणी. १०. कांहीं वेळ. ११. याचें मूळचें नांव 'नीचैः '
असें आहे. त्याचें मराठीत 'नीच' असें अपभ्रष्ट रूप केले आहे.