एक चाकोरीबाहेरचे संस्कृत ग्रंथालय

सर्व उपकरणांवर चालू शकणाऱ्या ह्या आंतरजालातील निःशुल्क ग्रंथालयाद्वारे समग्र संस्कृत साहित्य शब्दशः स्पष्टीकरण आणि अंतर्भावित शब्दकोश यांच्यासह सहजतेने उपलब्ध होत आहे.

ह्या ग्रंथालयाचा धांडोळा घ्या

विश्वातील सर्वात मोठ्या संस्कृत ग्रंथालयाचे निर्माण

संस्कृत ग्रंथ डझनावारी संकेतस्थळे, हजारो पुस्तके आणि लाखो हस्तलिखितांमध्ये सध्या विखुरलेले आहेत. त्यांची गुणवत्ता आणि त्यांचा वापर करण्यासाठी आवश्यक सोपेपणा ह्यांच्यात जागोजागी बराच फरक आढळतो. तसेच संस्कृतातील ज्ञानसंपदेचा सर्वंकष धांडोळा घेण्यासाठीचा सोपा उपाय सध्या अस्तित्वात नाही.

म्हणूनच अंबुद पारंपारिक संस्कृत वाङ्मयाच्या परिपूर्ण ग्रंथालयाचे निर्माण करत आहे. आमच्या ग्रंथालयाचा आकार सध्या लहान आहे, पण त्याची वाढ वेगाने होत आहे. लवकरच ते जगातले सर्वात मोठे संस्कृत ग्रंथालय बनेल.

सर्वांना वापराची पूर्ण मोकळीक

जर आपल्याला कोठेही निःशुल्क रूपात संस्कृत साहित्य वाचता आले, जर आंतरजालावर संस्कृत साहित्य वाचण्याचा अनुभव सुंदर आणि आनंददायी होऊ शकला, जर आपल्याला आपल्या मातृभाषेतच संस्कृत ज्ञानभांडार सहज उपलब्ध होऊ शकले तर काय बहार येईल?

आम्हाला अजून बरीच वाटचाल करायची आहे, शक्य तितक्या अधिक लोकांना आमचे ग्रंथालय पूर्णपणे उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे. तूर्त, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे आपण आमच्या संकेतस्थळाचा वापर करू शकता. लवकरच आम्ही हे संकेतस्थळ इंग्रजीखेरीज इतर भाषांमध्येही उपलब्ध करून देऊ.

चतुर तंत्रज्ञान

शब्दशः स्पष्टीकरण, शब्दकोशांचा अंतर्भाव, विविध लिप्यांमध्ये लिप्यंतर आणि इतरही बरीच वैशिष्ट्ये आमच्या ग्रंथालयाच्या ठायी आहेत. संस्कृत साहित्य पूर्वीपेक्षा अधिक सुलभतेने सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आमचे हे चतुर ग्रंथालय अतिशय अद्ययावत् अशा तंत्रज्ञानाचा वापर करते.

आमचे काम नुकतेच सुरू झाले आहे. भविष्यासाठी अनेक योजनांची आखणी आम्ही केलेली आहे, उदाहरणार्थ, भाषांतरे, व्याख्या, संपूर्ण ग्रंथातील शब्दांचा शोध घेण्याची सोय आणि संपूर्ण साहित्यशरीरात खोलवर जाणारे परस्परसंबद्ध दुवे तयार करणे.

लोकांद्वारे, लोकांसाठी

अंबुद हा प्रकल्प पूर्णपणे स्वयंसेवकांद्वारे चालवला जातो आणि शक्य त्या रूपात आपले साहाय्य ह्या प्रकल्पाला लाभू शकले तर आम्हाला अतिशय आनंद होईल. अंबुदच्या वाढीसाठी आपण कसे साहाय्य करू शकता हे जाणून घ्या.

अंबुदची वाढ त्वरेने होत आहे. आमच्या विद्युत्पत्र यादीत समाविष्ट होण्यासाठी नोंदणी करा आणि अंबुदमध्ये समाविष्ट होणारी नवीन सामग्री तसेच विशेष सोई यांविषयीच्या ताज्या बातम्या नियमितपणे मिळवा.

संस्कृत झाले आता आपल्या तळहातावरील आवळ्यासारखे

आमचे काम नुकतेच सुरू झाले आहे. आपण अंबुदचा वापर करत आहात याबद्दल आपले आभार.

ह्या ग्रंथालयाचा धांडोळा घ्या