We're performing server updates until 1 November. Learn more.

This page has not been fully proofread.

द्वितीयावृत्तीची प्रस्तावना
 
( In Marathi. )
 
7.5
 
१ ही जी न्यायकोशाची द्वितीयावृत्ति छापली आहे तीस द्वितीयावृत्ति न
समजतां प्रथमावृत्तिच म्हणणें विशेष शोभेल. कारण इसवी सन १८७४
साली जेव्हां पहिल्यानें न्यायकोश छापण्यांत आला तेव्हां त्याचीं पृष्ठे
सारी २६७ झालीं होतीं. ह्या द्वितीयावृत्तीच्या वेळीं होईल तितकी काट-
कसर करून मोठ्याच संक्षेपानें हा ग्रन्थ छापला असतांनाही ह्याचीं पृष्ठे
एक हजारावर झालीं आहेत. त्यावरून आतांचें न्यायकोशाचें स्वरूप
पूर्वीपेक्षां फार भिन्न आहे असे वाचकांच्या सहज लक्षांत येईल.
 
२ ही द्वितीयावृत्ति छापण्याचें काम म्हणजे नवीन शब्दांचा समावेश
करणें, नवीन मूळप्रत तयार करून देणें, लिखित प्रत शोधणें, व प्रूफशीटें
तपासणें वगैरे; ह्या कामास इसवी सन १८८६-८७ सालामध्ये सुरुवात
झाली. तें आज सुमारें ७/८ वर्षे एकसारखें चालले आहे. आतां हें काम
फार वर्षे चालले आहे ह्मणून तें फार सुस्तपणानें चालले आहे असें
कोणास वाटेल. परंतु माझे इतर व्यवसाय संभाळून हा ग्रन्थ तडीस
नेण्याकरितांच मी आज सात आठ वर्षे दररोज नऊ नऊ तास काम
करीत आलों आहे. न्यायकोशासारखा ग्रन्थ करणें हें काम किती जोखिमीचें
आहे व वार्धक्य हें अव्याहत परिश्रम करण्याला कसें प्रतिबन्धक होतें
याचा विचार केला असतां हा ग्रन्थ सात आठ वर्षांत पुरा झाला म्हणजे
लवकरच पुरा झाला असें कोणालाही वाटण्यासारखे आहे.
 
३ इसवी सन १८७४ सालीं न्यायकोशाची प्रथमावृत्ति निघाली तेव्हां -
पासून निरनिराळीं शास्त्रीय पुस्तकें वाचतांना जे जे शास्त्रीय पारिभाषिक
शब्द मजला आढळले त्या त्या शब्दांचा "संग्रहः खलु कर्तव्यः कदाचि-
त्फलदायकः" या न्यायानें काळजीपूर्वक संग्रह करून ठेवून ते सर्व शब्द
या कोशाचे प्रस्तुत आवृत्तींत गोंविल्यामुळे पहिल्या आवृत्तींतील न्याय-
कोशामध्यें जितक्या पारिभाषिक शब्दांचा समावेश झाला होता त्यापेक्षां
चौपट जास्त पारिभाषिक शब्दांचा ह्या आवृत्तींत समावेश झाला आहे.
ह्यांतील निरनिराळ्या शब्दांवर घेतलेलीं टिप्पणें, निर्णय, सिद्धान्त वगैरे
 
3 न्या. को.