This page has not been fully proofread.

द्वितीयावृत्तीची प्रस्तावना
 
१९
 
५ हल्लीं जिकडे तिकडे इंग्रजी भाषेचा प्रसार फार झाल्यामुळे संस्कृत
भाषा ही ह्या भरतखंडामध्येंसुद्धां लुप्तप्राय झाली आहे. झणून इंग्रजी भाषे
मध्ये केलेल्या ग्रंथाचें जसें चीज होतें तसें संस्कृत भाषेमध्ये केलेल्या
ग्रंथाचें होत नाहीं. जर प्रस्तुत ग्रंथ इंग्रजीमध्यें भाषांतररूपानें झाला असता
तर व्यास किती महत्त्व आलें असतें याची वाचकांनींच कल्पना करावी.
भरतखंडामध्यें प्रसिद्ध केलेल्या संस्कृत ग्रंथाच्या [ एतद्देशीय आंग्लविद्या-
विशारद, प्रतिष्ठाकाम, विद्वन्मन्य, आधुनिक विद्वानांस ] योग्यतेची व
उपयुक्ततेची थोरवी पश्चिमदिशेकडून फडकत आल्याशिवाय दिसत नाहीं.
करितां बर्लीन येथील प्रसिद्ध संस्कृतज्ञ प्रोफेसर वेबर आणि इतर संस्कृतज्ञ
पाश्चात्य विद्वान् ह्यांनी माझ्या न्यायकोशाची प्रथमावृत्ति वाचतांना "प्रोफेसर
गोल्डस्टकर" यांचें स्मरण करून न्यायकोशाचें महत्व वर्णन केल्यावरूनच
व्यप्रचित्तानें न्यायकोशाची स्तुति व संग्रह करणाऱ्या एतद्देशीय आधुनिक
विद्वानांवर न्यायकोशाच्या प्रस्तुत आवृत्तीच्या उपयुक्ततेच्या संबंधानें
अवलंबन धरून न राहतां, प्रोफेसर जी० बुलेर आणि मॅक्समुल्खर,
कीलहार्न आणि वेबर इत्यादि परराष्ट्रीय विद्वान् लोकांना तरी या कोशाचा
उपयोग होईल असे समजून मी आपल्या मनाची तृप्ति करून घेईन.
आणि हजारों शास्त्राध्ययन करणाऱ्या मद्देशबांधवांपैकी एखाद्या खऱ्या
मार्मिक ज्ञात्यास तरी हा कोश उपयोगी झाल्यास मी आपणास कृतकार्य
मानून माझ्या श्रमाचें फल मजला मिळाले असे समजेन.
 
६ मेहेरबान के० एम्० चाट्फील्ड साहेब, मुंबई इलाख्यांतील
विद्याखात्याचे डायरेक्टर यांनी न्यायकोशाचें महत्त्व व उपयुक्तता जाणून
त्यास पुनर्जन्म देवविला आणि संस्कृत भाषेच्या उत्कर्षास व शास्त्रांचें
सुलभ रीतीनें अध्ययन करण्यास ते साधनीभूत झाले यामुळे त्यांचे सर्व
संस्कृत जिज्ञासु लोकांवर फार उपकार झाले आहेत व माझी न्यायविद्या
सफल झाली. त्याजबद्दल मी साहेबमजकुरांचा फार फार आभारी आहे.
 
शके १८१५
आषाढमास.
 
न्यायकोशकर्ता.
 
}
 
6
 
h