This page has not been fully proofread.

१८
 
द्वितीयावृत्तीची प्रस्तावना
 
पाहून विद्वान् व शास्त्रमर्मज्ञ वाचकांस माझे मनोविचार व बुद्धिपरिश्रम
यांची अप्रमेयता व अचंबा वाटेल; इतकेंच नाहीं तर शास्त्रीय ग्रन्थ
वाचणारांस व त्याचा अभ्यास करणाऱ्यांस प्रस्तुत कोश फारच उपयोगी
होईल असें त्यांना वाटल्यावांचून राहणार नाहीं. संस्कृत शब्दांचे जे कोश
आज काल झाले आहेत ते सर्व फक्त काव्य पढण्याच्या उपयोगी आहेत,
शास्त्र पढण्याचे उपयोगी नाहींत. म्हणून शास्त्रीय व लोकोपयुक्त असे शब्द
शोधून घेऊन मीं हा जो न्यायकोश रचला आहे तो न्याय, वैशेषिक,
पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सौख्य, व पातञ्जल ह्या सहाही शास्त्रांचें अध्ययन
करणाऱ्यांस फार उपयोगी होईल अशी माझी पूर्ण उमेद आहे.
 
४ न्याय-वैशेषिक शास्त्रांवर असंख्य ग्रंथ आहेत, ते सर्व ग्रंथ माझ्या-
सारख्या असहाय मनुष्याला मिळणें हें अवघड आहे. शिवाय जे ग्रंथ
मिळणें शक्य होते ते ग्रंथ सुद्धां यत्न केला असतांनाही दुर्दैवानें मला
मिळाले नाहींत, यामुळे व प्रस्तुत कोश रचण्याचे काम दुसऱ्या कोणाही
विद्वानाची मजला मदत नसल्यामुळे सर्व शास्त्रीय ग्रंथ गोळा करून व
यांतील शब्द काढून ते या न्यायकोशामध्ये घालावयास मजला सवड
मिळाली नाही ह्याचें फार वाईट वाटतें. ह्यासंबंधानें आधुनिक विद्वानां-
विषय एक विशेष खेदकारक गोष्ट मजला येथें सांगणें भाग पडतें, ती
अशी कीं, प्राचीन विद्वान् लोकांस 'धर्मभोळेपणामुळे, लोभामुळे व मनाच्या
कोत्या समजुतीनें आपले जुने ग्रंथ प्रसिद्धीस आणीत नाहींत' म्हणून हळींचे
लोक नांवें ठेवितात व उपहास करितात. तरी नवीन विद्वानांमध्येही
असाच उणेपणा दिसून येतो. असो. आतां हा ग्रंथ सर्वथा परिपूर्ण आहे
असें माझें मुळींच झणणें नाहीं. कारण त्याला सर्व गोष्टींनीं परिपूर्णता
असणें हें एका असहाय व्यक्तीला अशक्य आहे. व त्यांत मानसिक श्रम
करण्याची कितीही उमेद असली तरी पुस्तकरूपी व इतर बाह्य मदती-
शिवाय ती जितकी फलद्रूप व्हावी तितकी होणार नाहीं. तथापि हा ग्रंथ
वाचून वाचकांना जर उत्साह वाटला व माझ्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन
ह्या प्रथांत भर घालण्याचें जर त्यांच्या अंगांत स्फुरण आलें तर माझे
श्रमाचें कांहीं तरी चीज झालें असें म्हणण्यास हरकत नाहीं.