This page has not been fully proofread.

प्रस्तावना.
 
आह्मी मल्लिनाथाच्या क्रमाप्रमाणें कायम ठेविला आहे. मूळाच्या
शेवटीं मल्लिनाथानें तीन क्षेपक श्लोक दिले आहेत ते मूळांतील
संविधानकाची हानि करणारे आहेत असें वाटल्यावरून आली ते
मूळाच्या शेवटीं दिले नाहींत व त्यांचें भाषांतरहि केलें नाहीं. याशि-
वाय पूर्व व उत्तर मेघ यांतहि मल्लिनाथानें कांहीं क्षेपक श्लोक
दिले आहेत. त्यांतून मूळाशीं सुसंगत असे जे आढळले तेच
ठेवून त्यांचे भाषांतर आह्मीं केलें आहे. अशा क्षेपक श्लोकांस
भाषांतरांत निराळे अंक न देतां त्यांस अ, ब, क अशा संज्ञा
दिल्या आहेत; परंतु त्यांच्या स्थानाची व्यवस्था मल्लिनाथाच्या-
प्रमाणेंच ठेविली आहे.
 
मूळांतील जितकीं पदें घेतां येतील तितकीं घेऊन भाषांतर करण्या-
चा प्रायः क्रम ठेविला आहे. श्लोकास श्लोक असें हें भाषान्तर नाहीं.
एका मूलश्लोकाचे भाषांतरांत कित्येक ठिकाणीं अनेक श्लोक झा-
लेले आहेत. कोठें कोठें अर्थ पुरा करण्याकरितां एका किंवा अनेक
पूर्ण श्लोकांपुढे श्लोकार्धहि घालावा लागला. या नवीन प्रकाराविषयीं
मैतभेद आहे; तथापि त्यांत सोय आहे ह्मणून आली त्याचा अं-
गीकार केला आहे. तसेंच जुने मराठी कवी बहुतकरून प्रत्येक
चरणांत पूर्ण अर्थ आणतात, निदान श्लोकार्थात तरी त्यांच्या वि-
वक्षित अर्थाची समाप्ति होते. प्रस्तुत भाषांतरांत दोन चार ठि.
काणीं या जुन्या संप्रदायाचें उल्लंघन झाले आहे. भाषांतरांत यो-
१. प्रस्तुत भाषान्तरावर अभिप्राय देतांना डा. भाण्डारकर यासंबंधानें
'अर्से लिहितात:-
' He (Mr. Lele) has taken the liberty of giving in some
cases six lines when the sense of the original shloka of
four lines could not be brought out in four Marathi lines.
But I suppose in a growing literature such as that of
the Marathi language, authors should not be tied down
by strict and artificial rules; and after all it
appears to
me that the rule which requires that a shloka should be
composed of four lines only is of this nature.'