2023-02-21 17:21:10 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
प्रस्तावना.
त्मक भाषांतर प्राकृत सांकी-वृत्तांत रचिलेलें आहे व त्याचें कर्तृत्व
प्रसिद्ध पंडित कै· कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याकडे आहे हें
मराठी वाचकांस ठाऊक आहे. कालिदासासारखा अप्रतिम कवि,
मेघदूतासारखी त्याची अपूर्व कृति आणि कृष्णशास्त्रीबोवासारखा
मार्मिक व कुशल भाषांतरकार असा हा असाधारण प्रसंग
पाहण्याची संधि क्वचित् येते. शास्त्रीबोवांचें भाषांतर फारच गोड
उतरलें आहे हें अर्थात् सांगणे नको. मेघदूताचीं गद्यात्मक भाषां-
तरें इसलामपूरकरप्रभृतींनीं केलीं आहेत.
कालिदासानें मेघदूतकाव्यांत त्यांतील रसास फारच अनुकूल
असें मन्दाक्रांता वृत्त योजिलें आहे. तेंच वृत्त भाषांतरांत योजून
तें कसें काय साधतें हैं पाहण्याच्या इच्छेने प्रस्तुत भाषांतर तयार केलें
आहे. या वृत्तचमत्काराशिवाय हे भाषांतर करण्याचा दुसरा कोणता-
हि हेतु नाहीं.
निर्णयसागर छापखान्यांत इ. स. १८७७ सालीं मल्लिना-
थाच्या टीकेसह छापलेल्या मेघदूताच्या मूळाची प्रत, रा० सा०
काशीनाथपंत पाठक यांनी इ. स. १८९४ सालीं प्रसिद्ध के-
लेल्या पार्श्वभ्युदयोद्धृत मेघदूताचें पुस्तक व कै० चिपळूणकर यांचे
मराठी साकीबद्ध भाषांतरयांच्या आधारानें प्रस्तुत भाषांतर तयार
केलें आहे. निर्णयसागरांत छापलेलें मूळ व पांव भ्युदयांतील
मूळ हीं दोन्हीं तपासून पाहतां पाठांसंबंधानें दोहोंत बराच फेर-
फार आमच्या नजरेस आला. कालिदासाच्या ग्रंथरचनेचें एकंदर
धोरण लक्ष्यांत आणून व त्या त्या ठिकाणचा संदर्भ मनांत आ-
णून आह्मांस जे पाठ पसंत पडले तेच आली कायम केले आहेत
आणि त्यांचेंच भाषांतर केलें आहे. मूळांतील श्लोकांचा क्रम
१. पार्श्वाभ्युदय नांवाचे एक काव्य आहे. याचा कर्ता जिनसन म्हणून
एक जैन कवि होता. यानें समस्येच्या पद्धतीने संपूर्ण मेघदूत वरील
काव्यांत आणिलें आहे. हा कवि कालिदासानंतर दीड दोन शतकांच्या
आंत झाला असावा असें रा. सा. पाठक यांनी आपल्या मेघदूताच्या आ-
वृत्तीच्या प्रस्तावनेंत लिहिलें आहे.