This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-उत्तरमेघ.
 
मूल श्लोक.
 
एतत् कृत्वा प्रियमनुचित प्रार्थनावर्तिनो मे ।
सौहार्दाद्वा विधुर इति वो मय्यनुकोशबुध्या ॥
इष्टान् देशाञ्जलद विचर प्रावृषा संभृतश्री ।
र्मा भूदेवं क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः ॥ ५ ॥
 
भाषान्तर •
 
सांगावें मीं मुळिं न तुज हें काम, संकोच भारी ।
होतो चित्तीं, परि तुजविणें कोण हा ताप वारी ॥
स्नेहानें वा हृदयिं करुणा येउनी वा दयाळा ।
या दीनाचें झडकरि, घना, काज ने शेवटाला ॥ ६८ ॥
माझें झाल्यावरति सगळें कार्य हें जा फिराया ।
होवोनीया सजल सुभग प्रौवृषें, मेघराया ॥
जो जो वाटे रुचिर तुजला देश तो तोचि भोग ।
होवो ऐसा पळहि न तुला विद्युतेचा वियोग ! ॥ ६९ ॥
 
६७
 
१. वर्षाकालानें. या कालांत मेघ जलयुक्त आणि सुंदर असतात.
२. विजेचा; अर्थात् बायकोचा. यक्षानें या चरणांत मेघाला आशी-
र्वाद दिला आहे.
 
समाप्त.