This page has not been fully proofread.

m
 
मेघदूताचें समवृत्त
 
साभिज्ञानप्रहितकुशलैस्तदूचोभिर्ममापि ।
यातःकुन्दप्रसवशिथिलं जीवितं धारयेथाः ॥ ५० ॥
 
भाषान्तर•
 
ऐसें आश्वासन विरहिणीलागुनि तेथ देईं ।
तीतें मोठें, बिरह पहिला, यामुळें दुःख होई ॥
पूर्वी ज्याचीं त्रिनयनवृषें पाडिलीं उंच शृंगें ।
त्या कैलासावरुनि मग तूं ये त्वरेनेंचि मागें ॥ ६५ ॥
येतांना ती कथिल तुजला स्नेहसौभाग्यशाली ।
विश्वासानें हितगुज, खुणा, आणखी ती खुशाली ॥
येवोनी तें सकळ कळवीं, रक्षिं या जीवितास ।
प्रातःकुन्दासम शिथिलै हें जाहलें जाण खास ' ॥ ६६ ॥
मूलश्लोक.
 
कञ्चित्सौम्य व्यवसितमिदं बन्धुकृत्यं त्वया मे ।
प्रत्यादेशान्त्र खलु भवतो धीरतां तर्कयामि ॥
निःशब्दोऽपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः ।
प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सितार्थक्रियैव ॥ ५१ ॥
 
भाषान्तर.
 
बन्धो, हातीं खचित धरिलें कार्य कीं या जनाचें ? ।
किंवा ऐसें तुजसि पुसणे व्यर्थ आहेोचि साचें ॥
देशी निःशैब्दहि जल पहा र्यांचिलें चातकांनीं
दानाँलागी सुजन गणितो उत्तराच्या ठिकाणीं ॥ ६७ ॥
 
१.
 
नन्दीनें. २. प्रेम व ऐश्वर्य यांनी शोभणारी. ३. सकाळच्या
कुन्दासारखें. ४. म्लान. ५. कांहीं एक न बोलतां. ६. मागितलेलें.
 
6
 
सुजन दानालागी उत्तराच्या ठिकाणीं गणितो' असा अन्वय.
याचकाची इच्छा तृप्त करणें हेंच याचकाला उत्तर असा थोरांचा
मार्ग आहे, ते वृथा बडबड करीत नाहीत असा भाव.