This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-उत्तरमेघ.
 
एकाएकीं डचकुनि पुढें तूं रडूं लागलीस ।
तैसी जागी खडखडित ही तत्क्षणीं जाहलीस ॥
तेव्हां तूतें फिरुनि फिरुनी काय झालें ह्मणोनी ।
गोंजारोनी हळुच पुसलें, अंतरीं घाबरोनी.' ॥ ६॥
किंचित् गालामधिं हंसुनि तूं तेधवां बोललीस ।
"स्वप्नीं वाटे सवत मजला वंचुनी पाहिलीस ! " , ॥
 
O
 
मूलश्लोक •
 
एतस्मान्मां कुशलिनमभिज्ञानदानाद्विदित्वा ।
मा कौलीनाञ्चकितनयने मय्यविश्वासिनी भूः ॥
स्नेहानाहुः किमपि विरहे ध्वंसिनस्ते त्वभोगा- ।
दिष्टे वस्तुन्युपचितरसाः प्रेमराशीभवन्ति ॥ ४९ ॥
 
L
 
2
 
भाषान्तर•
 
'ही एकांतांतिलाच अगदीं खूण ऐकोनि आतां ।
कांते, माझें समज कुशल, स्वस्थ हो, सोड चिन्ता ॥
लोकांचे तूं परिसुनि, अगे लाडके, तेथ बोल ।
माझ्या जीवाविषयिं न धरीं भीति, ते होति फोलं. १ ॥६३ ॥
 
6
 
' झाले नाहीं तुजवरिल तें प्रेमही तेविं ऊन ।
जाणें प्राणेश्वरि, तुज न हैं सांगतों वाढवून ॥
कोणी कोणी ह्मणति विरहें प्रेम तें नाश पावें ।
आशेनें तें परि मज गमे वाढुनीया दुणावें. १ ॥ ६४ ॥
 
मूलश्लोक.
 
आश्वास्यैवं प्रथमविरहोदयशोकां सखीं ते ।
शैलादाशु त्रिनयनवृषोत्खातकूटान्निवृत्तः ॥
 
6
१.
 
स्वप्नीं वाटे ( कीं ) वंचुनी मजला सवत पाहिलीस !' असा
अन्वय्, ' वंचुनी ' या पदाबद्दल ' रे ठका ! ' हें पाठान्तर समजावें.
 
२,
 
खोटे.