This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
भाषान्तर.
 
'श्रीलक्ष्मीचा रमण उठतो शेषेशय्येवरोनी ।
न्या कालीं हा कॅठिण, सखये, शाप जातो सरोनी ॥
तेव्हां आतां तळमळ नको वाटुं देऊं जिवास ।
काढीं डोळे मिटुनि पुढचे राहिले चारै मास १ ॥ ६० ॥
'जे जे हेतु द्विगुणित मनीं जाहलेले वियोगें ।
ते ते साधूं परिर्णंतशरच्चंद्रिकेमाजि भोगें. ' ॥
 
मूलश्लोक.
 
भूयश्वाह त्वमपि शयने कण्ठलग्ना पुरा मे ।
निद्रां गत्वा किमपि रुदती सस्वनं विभबुद्धा ॥
सान्तसं कथितमसकृत् पृच्छतश्वत्वया मे ।
उष्टः स्वप्ने कितव रमयन् कामपि त्वं मयेति ॥ ४८ ॥
 
भाषान्तर.
 
'तैसी माझ्याजवळ बदला आणखी गोष्ट एक ।
वाणेश क्षणभरिंच ती लक्ष्य देऊन ऐक ॥
मागें एके दिवशिं शयनीं, लाडके, तूं गळ्यास ।
मोठ्या प्रेमें बळकट मिठी मारुनी झोंपलीस ' ॥ ६१ ॥
 
"
 
9. पति. ( विष्णु ) २. शेषाच्या चिछान्यावरून, चातुर्मास्यभर
विष्णु शयन करितात व तो संपला ह्मणजे उठतात या पुराणोक्त
गोष्टीचा येथे उल्लेख केला आहे. 3. हें शाप' याचें विशेषण.
ड. श्रावण, भाद्रपद, आश्विन व कार्तिक असे चार महिने. पूर्वमेघांत
आरंभीच कवीनें यक्ष व मेघ यांची गांठ आपाढामध्ये घालून
दिल्याचें वर्णन आले आहे. त्याशी हे चार महिने जुळतात. ५. दुप्पट
झालेले. ६. अतिस्वच्छ अशा
कार्तिक महिन्यांत संपतो; त्या वेळेस शरदृतु
झझटलें आहे. ७. भोग घेऊन, उपभोगानें.
 
शरत्कालांतील
 
चांदण्यामध्यें. शाप
असतो म्हणून असें