This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-उत्तरमेघ.
 
भाषान्तर•
 
'मोठी रात्री भरभर पळासारखी केविं जावी ।
व्हावा कैसा सतत दिनिंचा ताप अत्यल्प तेवीं ॥
 
ऐसें माझ्या उगिच भलतें येतसे मानसांत ॥
साहोनीया विरह न तुझा, दाह होतो तयांत ! " ॥ ५८ ॥
मूलश्लोक.
 
नन्वात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे ।
तत्कल्याणि त्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् ॥
कस्यात्यन्तं सुखप्रुपनतं दुःखमेकान्ततो वा ।
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण ॥ ४६ ॥
 
भाषान्तर
 
'दृष्टी सौख्यावरिल पुढच्या देउनी काल कंठी ।
तूंही प्राणेश्वरि ! ह्मणुनिया धैर्य चित्तांत गांठीं ॥
कोणा आहे वद सुख सदा, दुःखही तेविं लोकीं ? ।
चक्रेन्यायें क्रम सतत हा चालतोसे विलोकीं ॥ ५९ ॥
मूलश्लोक.
 
शापान्तो मे भुजगशयनादुत्थिते शार्ङ्गपाणी ।
शेषान् मासान् गमय चतुरो लोचने मीलयित्वा ॥
पश्चादावां विरहगुणितं तं तमात्माभिलाषम् ।
निर्वेक्ष्यावः परिणतशरच्चंद्रिकासु क्षपासु ॥ ४७ ॥
 
६३
 
१. (मी) काढतों. २. चाकाच्या न्यायानें. चाकाचें एक अंग जस
चरती जातें व दुसरें खालीं येतें व फिरून वरचें खाली व खालचें
वरती असा चालतो तद्वत् सुखदुःखाची स्थिति आहे.
 
अखंड सुख किंवा अखंड दुःख अशी स्थिति असंभवनीय आहे.
चार दिवस सुखाचे तर चार दिवस दुःखाचे येतात असा भाव.