This page has not been fully proofread.

६२
 
मेघदूताचें समवृत्त
 
तेव्हां घ्यावी कडकडुनिया भेट, येतें मनांत ।
 
या हेतूनें वरतिं करितों अंबरीं उंच हात ! १ ॥ ५५ ॥
'हें पाहोनी मन गहिंवरे एथल्या देवतांचे ।
येती डोळे भरुनिहि जलें दुःखयोगें तयांचे ।
त्यांतोनीया पुढतिं गळती अंबुचे बिंदु वाले ॥
ठायीं ठायीं तैरुकिसलयीं मौक्तिकौएवढाले ! १ ॥ ५६ ॥
मूलश्लोक.
 
भिवा सद्यः किसलयपुटान् देवदारुद्रुमाणां ।
ये तत्क्षीरसुतिसुरभयो दक्षिणेन प्रवृत्ताः ॥
आलिङ्गचन्ते गुणवति मया ते तुषाराद्रिवाताः ।
पूर्व स्पृष्टं यदि किल भवेदङ्ग मेभिस्तवेति ॥ १४ ॥
 
भाषान्तर.
 
'भेदोनीया किसलयपुटां देवदारुद्रुमांच्या ।
होवोनीया सुरंभित रसें आंतल्या जाण त्यांच्या ॥
आलिंगोनी विमँलहि तशा तेथ अद्रीश्वरातें ।
केव्हां केव्हां पवन इकडे येतसे मन्द कान्ते' ॥ ५७ ॥
'आलिंगी मी, गुणवति, तया वादुनीया मनाला ।
स्पर्शोनीया तब सुतनुला येथ कीं प्राप्त झाला ! १ ॥
मूलश्लोक.
 
संक्षिप्येत क्षण इव कथं दीर्घयामा त्रियामा ।
सर्वावस्थास्वहरपि कथं मन्दमन्दातपं स्यात् ॥
इत्थं चेतश्चदुलनयते दुर्लभप्रार्थनं मे ।
गाढोष्माभिः कृतमशरणं त्वद्वियोगव्यथाभिः ॥ ४५ ॥
 
2
 
१. झाडांच्या पालवीवर. २. मोत्या एवढाले. 3. या क्रियेचें कर्तृ-
त्व चवथ्या चरणांतील 'पवन' या पदाकडे आहे. ४. पालवीच्या
अंकुरांस. ५. देवदारांच्या झाडांच्या. ६. सुगंध ७. पवित्र, ८. हें
संबोधन आहे. हे गुणयुक्ते प्रिये असा अर्थ.