This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-उत्तरमेघ.
 
चंद्रामाजी उतरलि खुबी वाटते त्वन्मुखींची ।
चाळे, बाळे, तव भिंवइचे दाविती वौरिवीची ॥ ५३ ॥
'केशांचीही तव सुभगता मोर दावी पिसांनीं ।
नाहीं साम्य प्रिय परि तुझें येथ एके ठिकाणीं !
मूलश्लोक.
 
त्वामालिख्य प्रणयकुपितां धातुरागैः शिलाया- ।
मात्मानं ते चरणपतितं यावदिच्छामि कर्तुम् ॥
अस्स्रैस्तावन्मुहुरुपचितैर्दृष्टिरालुप्यते मे ।
क्रूरस्तस्मिन्नपि न सहते संगमं नौ कृतान्तः ॥ ४२
 
भाषान्तर.
 
'लाडानें तूं रुसलिस, असें चित्र काढोनि रंगें।
पाषाणीं; मी चरण धरितों हे पुढें दावुं लागे ॥
येती डोळे भरुनि तंव हे, क्रूर तें दैव आहे; ।
त्याला चित्रांतहि न खपते आपुली भेट पाहें ! ? ॥ ५४॥
मूलश्लोक.
 
मामाकाशमणिहितभुजं निर्दया श्लेषहेतो--1
लब्धायास्ते कथमपि मया स्वमसंदर्शनेषु ॥
पश्यन्तीनां न खलु बहुशो न स्थलीदेवतानां ।
मुक्तास्थूलास्तरुकिसलयेष्वञ्जुलेशाः पतन्ति ॥ १३ ॥
 
भाषान्तर.
 
आहे कोठें तब जिवलगे भेट माझ्या कपाळीं ।
रात्रीं स्वप्नीं परि जरि कधीं दैवयोगें जहाली ॥
 
पाण्याच्या लाटा. ३. तुझ्या
डोळे पाण्याने भरून येतान
 
१. तुझ्या मुखावर असणारी. २.
विरहदुःखाचा एकदम उमाळा येऊन
त्यामुळे कांहीं दिसेनासें होऊन चित्र पुरे करण्याचें काम चंद पडते,
आणि त्या कारणानें चित्रामध्ये देखील आपली भेट होण्याचा प्रसंग
दुर्दैवानें येत नाहीं असा भाव.