This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
ढाळी अभ्रू तुजसम, तसे उष्ण टाकी उसासे ।
उत्कंठेनें; सकलाचे तुलांमाजि हें साम्य भासे' ॥ ५१ ॥
मूलश्लोक.
 
शब्दाख्येयं यदपि किल ते यः सखीनां पुरस्तात् ।
कर्णे लोलः कथयितुमभूदानन स्पर्शलोभात् ॥
सोऽतिक्रान्तः श्रवणविषयं लोचनाभ्यामदृष्ट-
स्त्वामुत्कण्ठाविरचितपदं मन्मुखेनेदमाह ॥ ४० ॥
 
भाषान्तर.
 
6
 
जें बोलाया खचित तुझिया मैत्रिणींच्या समोर ।
कांहीं सुद्धां अडचण नसे तेंहि जो कैकैवार ॥
सांगायातें हळुच तुझिया, लागला थेट कानीं ।
घ्यावें प्रेमें मधुरतरशा चुंबनातें ह्मणोनी ' ॥ ५२ ॥
झाला दृष्टिश्रवणविषया दूर तो कान्त, तेणें ।
प्रेमोत्कंठायुतवचन हें बोलतो मन्मुखानें ? ॥
 
6
 
7
 
मूलश्लोक.
 
श्यामास्वङ्गं चकितहरिणीप्रेक्षणे दृष्टिपातं ।
वक्त्रच्छायां शशिनि शिखिनां बर्ह भारेषु केशान् ।
उत्पश्यामि मतनुषु नदीवीचिषु भ्रूविलासान् ।
हन्तैकस्मिन् क्वचिदपि न ते चण्डि ! सादृश्यमस्ति ॥४१॥
 
भाषान्तर.
 
श्यौमांमध्यें मृदुपण दिसे, राहतें जें त्वदंगीं ।
त्वँनेत्राची ढबहि मिरवी भीतियुक्ता कुरङ्गी ॥
 

 
१. नैकवार, वारंवार हा शब्द अगदी भाषणसंप्रदायांतील
असल्यामुळे कवितेंत कर्णकटु लागतो. शिवाय तो बायकांच्याच
बोलण्यांत विशेषतः येत असून त्याचा अर्थही संकुचित असतो.
तथापि निरुपायास्तव 'वारंवार' या अर्थीच येथें तो योजला आहे.
२. डोळे व कान यांच्या टप्याच्या ( बाहेर ). दृष्टीनें न दिसणारा व
कानानें ज्याची बातमी ऐकू येत नाहीं असा. 3. प्रेम आणि उत्कं-
ठा यांनी भरलेलें. ४. माझ्या मुखानें. ५. प्रियंगु नांवाच्या वेलींत.
६. तुझ्या ठिकाणीं ७. तुझ्या डोळ्याची. ८. हरिणी.