This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर - उत्तरमेघ.
 
मूलश्लोक.
 
तामायुष्मन् मम च वचनादात्मनश्चोपकर्तुं ।
ब्रूयादेवं तव सहचरो रामगिर्याश्रमस्थः ॥
अव्यापन्नः कुशलमबले पृच्छति त्वां वियुक्तः ।
पूर्वाभाष्यं सुलभविपद् प्राणिनामेतदेव ॥ ३८ ॥
 
भाषान्तर.
 
यावा मान, प्रिय जलधरा, माझिया मागण्यातें ।
तैसा व्हावा, हित करुनिया आमुचें, हैर्ष तूलें ॥
हे आयुष्मन्, हृदयिं धरुनी हेतु हे दोन साचे ।
कान्तेलागी प्रियकर असे शब्द तूं बोल वाचेः–॥ ४८ ॥
 
भाषान्तर
 
6
 
आहे, बाले ! प्रियपति तुझा रामगिर्याश्रमांत ।
कंठीं तेथें दिवस तुजला आठयोनी मनांत ॥
"आहेना गे कुशल सखये ? " तो पुसे; ज्या छळावें ।
दुर्दैवानें, प्रथम दुसरें काय त्याला पुसावें!' ॥ ४९ ॥
मूलांक
 
५९
 
अङ्गेनाङ्गं प्रतनु तनुवा गाढततेन तप्तं ।
साखेणाश्रुद्रुतमविरतोत्कण्ठमुत्कंठितेन ॥
उष्णो समधिकतरोच्छ्रासिना दूरवर्ती ।
संकल्पैस्तैर्विशति विधिना वैरिणा रुद्धमार्गः ॥ ३९ ॥
 
भाषान्तर.
 
6
 
राहे प्राणप्रियतम तुझा नाथ तो दूरदेशीं ।
भेटीसाठीं तळमळ करी होय ती सांग कैसी ? ॥
आहे मोठें खडतर उभें दैव वाटेमधें ना ।
कांहीं केल्या अणुहि पुढतीं त्याचिया जाववेना ॥ ५० ॥
'गेलासे तो झड्डुनि विरहें तूंहि गेलीस तेवीं ।
जाळी कामज्वर बहु तुला त्याजलागोनि जेवीं ॥
 
7
 
१. याचा 'व्हावा' या क्रियापदाकडे संबंध आहे. २ मदनाचा ताप.