This page has not been fully proofread.

प्रस्तावना.
 
भाषांतरास जोडावा अशी इच्छा होती. पण ती सफल झाली
नाहीं. कारण त्या मार्गांतील कांहीं प्राचीन स्थलांचीं हल्लींचीं
नांवें कोणतीं आहेत व तीं स्थलेंहि नक्की कोठे आहेत याचा
बरोबर निर्णय होत नाहीं.
 
याप्रमाणें मूलकाव्य सर्वांगसुंदर झाले आहे. कवीनें आपलें
बुद्धिसर्वस्त्र त्यांत खर्चिलें आहे यांत संशय नाहीं. हें लहानसें,
सुंदर, व चटकदार काव्य गीर्वाणभाषेतील काव्यमालेस अपूर्व
शोभा देणारें एक अमूल्य रत्न आहे अशी आमची समजूत आहे.
 
मूलग्रंथ सरस असला म्हणजे त्याची सहजच फार प्रतिष्ठा
होते व त्याची भाषांतरापर्यंत मजल येऊन पोहोंचते. त्यां-
तूनहि मूलग्रंथ फारच बहारीचा असला तर त्याचे एका भा-
षेंत सुद्धां अनेक भाषांतरकार किंवा टीकाकार निपजतात.
याची उदाहरणें आपल्या मराठी भाषेंत थोडीं आहेत असें नाहीं.
एकनाथ, मुक्तेश्वर, बामनपंडित, श्रीधर, मोरोपंत इत्यादिकांची
प्रासादिक काव्यस्फूर्ति रामायण, महाभारत व भागवत या प्रसिद्ध
व मान्य पुराणग्रंथांत यथेच्छ रममाण झाली आहे. श्री-
मद्भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरमहाराजांपासून तो बाँईकर लेलेशास्त्री
यांच्यापर्यंत, टीकाकार किंवा भाषांतरकार या नात्यानें अने
कांचे परिश्रम झालेले आहेत. कै० परशुरामपंत गोडबोले
व कै· महादेव चिमणाजी आपटे यांनीं फार मार्मिक रीतीन
शाकुन्तल मराठीत आणून ठेविलें आहे; त्याच शाकुन्तलास
कै० किर्लोस्कर यांनी संगीताच्या सहाय्यानें निराळें मोहक स्वरूप
दिलें आहे. कै० परशरामपंत गोडबोले व कै· ती० गणेशशास्त्री
लेले यांनी कादंबरीला साधा पण नीटनेटका मराठी पोषाक
दिलेला आहे; त्याच कादंबरीला रा० देवल यांनी आपल्या कर्तृ-
त्वानें रंगभूमीवर आणून सोडिलें आहे. असो.
 
मेघदूताचींहि यात्रमाणें दोन तीन भाषांतरें मराठीत झालेली
आहेत. त्यांत एक पद्यात्मक असून दुसरीं गयात्मक आहेत. पया-