This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर - उत्तरमेघ.
 
मूलश्लोक.
 
तस्मिन् काले जलद यदि सा लब्धनिद्रासुखा स्या- ।
दन्वास्यैनां स्तनितविमुखो याममात्रं सहस्व ॥
मा भूदस्याः प्रणयिनि मयि स्वप्नलब्धे कथंचित् ।
सद्यः कंठच्युतभुजलताग्रंथिगाढोपगूढम् ॥ ३४ ॥
 
भाषान्तर.
 
तेव्हां तीतें जरि जलधरा झोंप आली असेल ।
कंठीं एक प्रहर तरि तूं स्वस्थ बैसोनि वेळ ॥
दैवें स्वप्नीं बघुनि मजला आवळीतां करांनीं ।
मोठ्या प्रेमें, अणुहि न घडो विघ्न तीतें म्हणोनी ॥ ४४ ॥
मूलशोक.
 
तामुत्थाप्य स्वजल कणिकाशीत लेनानिलेन ।
प्रत्याश्वस्तां सममभिनवैर्जालकैमलतीनाम् ॥
विद्युद्गर्भः स्तिमितनयनां त्वत्सनाथे गवाक्षे ।
वक्तुं धीरः स्तनितवचनैर्मानिनीं प्रक्रमेथाः ॥ ३५ ॥
 
भाषान्तर.
 
जातां कांहीं समय करिं तूं मप्रियेलागि जागी ।
जातींपुष्पांसह, हिमैकणां शिंपुनीया तैदंगीं ॥
पाहोनी ती खिडकिंत तुला विस्मयातें वरील ।
तेव्हां धैर्ये स्तँनितवचनें यापरी तीस बोल:- ॥ ४५ ॥
मूलश्लोक.
 
५७
 
भर्तुर्मित्रं प्रियमविधवे विद्धि माम्बुवाहं ।
तत्संदेशैर्हृदयविहितैरागतं त्वत्समीपम् ॥
 
१. 'देवें मजला स्वप्नीं बघुनि मोठ्या प्रेमें करांनी आवळीतां तीतें
अणुहि विघ्न न घडो ह्मणोनी' असा अन्वय. २. जाईच्या फुलांसह.
इकडे तुझे थंड पाण्याचे थेंच लागून जाईच्या कळ्या उमलतील
तशीच तिकडे माझी प्रिया ते अंगाला लागतांच जागी होईल असा
भाव. ३. थंड अशा पाण्याच्या बिंदूंस. ४. तिच्या (प्रियेच्या )
 
अंगावर. ५.
 
गर्जनारूप वाणीनें.