This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
त्वय्यासचे नयनमुपरिस्पन्दि शंके मृगाक्ष्या
मीनक्षोभाच्चलकुवलय श्रीतुलामेष्यतीति ॥ ३२ ॥
 
भाषान्तर•
 
येवोनीया अलक वरतीं दूर ज्याला दिसेना ।
थोडीही ज्या बघ तुकतुकी काजळाची असेना ॥
मयत्यागें मुळिं र्भिवइचे दावितो जो न खेळ ।
डाँवा डोळा बघुनि तुज तो मत्सखीचा लवेल ॥ ४२ ॥
मासे पाण्यामधिं उसळुनी हालतें पद्म जेवीं ।
त्या कालीं तें वरिल, गमतें, पूर्ण शोभेस तेवीं ॥
मूलश्लोक.
 
वामश्वास्याः कररुहपदैर्मुच्यमानो मदीयै- ।
र्मुक्ताजालं चिरपरिचितं त्याजितो दैवगत्या ॥
संभोगान्ते मम समुचितो हस्तसंवाहनानां ।
यास्यत्पूरुः सरसकदलीस्तम्भ गौरश्चलत्वम् ॥ ३३ ॥
 
भाषान्तर.
 
आतां चिन्हें मुळिंच नसतीं ज्यावरी या नखांची ।
दुर्दैवें ज्यावरि न दिसतीं भूषणें मौक्तिकांची ॥
रत्यंतीं जो मम करतलीं योग्य संवाहनाला
तैसा वाटे सरसकदलीगर्भसा लोचनाला ॥ ४३ ॥
ऐसा वामँ, प्रियजलधरा, ऊँरुं तैं मत्प्रियेचा ।
पाहोनीया स्फुरण तुजला फार पावेल साचा ॥
 
१ या संबंधी सर्वनामांचा संबंध चवथ्या चरणांतील 'डोळा
या पदाकडे आहे. २. स्त्रीचा डावा डोळा, डावा हात, डावी मांडी
वगैरे डाव्या बाजूचे अवयव स्फुरण पावले असतां तो शुभ शकुन
समजावा असें शकुनशास्त्रांत सांगितले आहे. याच्या पुढच्या श्लो-
कांत कवीनें डाव्या मांडीसंबंधानें उल्लेख केलेला आहे. 3. हलणारें,
डोलणारें. ४. कमळ. हैं ' ( शोभेस ) वरिते' या अध्याहृत क्रियेचा
कर्ता. ५ यांचा संबंध पांचव्या चरणांतील 'ऊरु' या पदाकडे
आहे. ६. हातांनीं. ७. चोळण्याला, चेपण्याला. ८. रसयुक्त कर्दळी-
च्या गाभ्यासारखा. ९. डावा. हें 'ऊरु याचें विशेषण. १० मांडी.
 
$