This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-
-उत्तरमेघ.
 
मूलश्लोक.
 
सा सन्यस्ताभरणमबला पेशलं धारयंती ।
शैय्योत्सङ्के निहितमसकृहःखदुःखेन गात्रम् ॥
त्वामप्यत्रं नवजलमयं मोचयिष्यत्यवश्यं ।
प्रायः सर्वो भवति करुणावृत्तिरार्द्रान्तरात्मा ॥ ३० ॥
 
६६
 
भाषान्तर.
 
जी पुष्पांच्यासम मृदु तशी भूषणांहीं विहीन ।
ऐशी टाकी स्वतनु शयनीं, होउनी फार दीन ॥
धाराबाष्पें त्यजिशिल तिला पाहुनी तेथ वाटे ।
जो आर्द्रान्तिःकरण करुणा तन्मनीं फार दाटे ॥ ४० ॥
मूलश्लोक.
 
जाने सख्यास्तव मयि मनः संभृतस्नेहमस्मा ।
दित्थंभूतां प्रथमविरहे तामहं तर्कयामि ॥
वाचालं मां न खलु सुभगंमन्यभावः करोति ।
प्रत्यक्षं ते निखिलमचिराद्भ्रातरुक्तं मया यत् ॥ ३१ ॥
 
भाषान्तर.
 
माझ्या ठायीं तव वहिनिचें प्रेम अत्यंत राहे ।
तेणें ऐशी प्र्थमविरहीं ती असा तर्क आहे ॥
स्त्रैणत्वानें उगिच बदतों हें न ऐसें गणावें ।
 
मी जें बोले अनुभवुनि तें सर्व आतां बघावें ॥ ४१ ॥
मूलश्लोक.
रुद्धापांग यसरमलकैरञ्जनस्नेहशून्यं ।
प्रत्यादेशादापच मधुनो विस्मृतभ्रूविलासम् ॥
 
१. कोंवळ्या मनाचा असा याचा फलितार्थ आहे. मेघाचें अंत-
रंग जलमय असल्यानें आर्द्र असतें. यामुळे प्रकृतस्थली आर्द्रान्ति:-
करण पुरुषांमध्यें मेघाचा अंतर्भाव होऊन अर्थान्तरन्यासाची योग्य
संगति लागली. २. आतांपर्यंत वर्णन केल्याप्रमाणें. 3. पहिल्या
विरहामध्यें. 'प्रथमविरहीं ती ऐशी ( आहे ) असा तर्क आहे '
असा अन्वय. ४. बायकोविषयींच्या लंपटपणामुळें. ५. बोलत आहे.