2023-02-21 17:21:20 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
१४
मेघदूताचें समवृत्त
येतां अभ्रं स्थैलकमलिनी फुल्लु नोहे न सुत ।
तत्साम्यातें वरिल दयिता वाटतें या स्थितीत ॥
मूलश्लोक.
निःश्वासेनाधरकिसलयक्लेशिना विक्षिपन्त ।
शुद्धस्तानात्परुषमलकं नूनमागण्डलम्बम् ॥
मत्संभोगः कथमुपनयेत्स्वप्नजोऽपीति निद्रा - ।
माकाक्षन्तीं नयनसलिलोत्पीडरुद्धावकाशाम् ॥ २८ ॥
भाषान्तर.
ज्यांनीं जावा करपुनि, घना, ओंठ एका क्षणानें ।
उष्णोच्छ्छ्रासां बळकट अशा टाकुनीया मुखानें ॥
बाला गालांवरुनि वरतीं दूर वालांस सारी ।
शुद्धस्नानें दयितेंविरहीं जाहले शुष्क भारी ॥ ३७॥
व्हावी स्वप्नामधिं तरि पहा भेट माझी ह्मणोनी ।
ती निद्रेची बघत बसते वाट डोळे मिटोनी ॥
दुःखाचा तों मधिंच सहसा येवुनीया उमाळा ।
येती अभ्रू जमुनि, मग तो केविं लागेल डोळा ! ॥ ३८ ॥
मूलश्लोक.
आद्ये बद्धा विरहदिवसे या शिखा दाम हित्वा ।
शापस्यान्ते विगलितशुचा तां मयोद्वेष्टनीयाम् ॥
स्पर्शक्लिष्टामयमितनखे नासकृत्सारयन्तीं ।
गण्डाभोगात्कठिनविषमामेकवेणीं करेण ॥ २९ ॥
भाषान्तर.
जी शापाच्या प्रथम दिवशीं घातली फार साधी ।
मी सोडावी लणुनि ह्मणतों संपतां शाप आधीं ॥
ती तद्वेणी मलिन अणखी रुक्ष झाली असेल ।
मागें गालांवरुनि तिजला सारितां ती दिसेल ॥ ३९ ॥
१. जमिनीवरील कमललता. २. फुललेली. ३. होत नाहीं; अ-
सत नाहीं. ४. मिटलेली. ५. अभ्यंगविरहित स्नानानें ६. पतीच्या
विरहामध्यें. ७. याला (जे) हा अध्याहृत कर्ता. ' ( जे ) दयितविरहीं
शुद्धस्नानें भारी शुष्क जाहले (अशा) वालांस ' इत्यादि अन्वय.