This page has not been fully proofread.

C
 
मेघदूताचें समवृत्त
 
माझी होई स्मृति तंव तिला, लोटती अञ्जुधारा !
तेणें साऱ्या भिजुनि सहसा चिंब होतात तारा ॥ ३१ ॥
त्या हातांनीं पुसुनि मनिंचा शोकही आवरीते ।
मोठ्या यत्नें; चुकुनि परि ती तीच ती तान घेते ! ॥
मूलश्लोक.
शेषान्मासान् विरहदिवसस्थापितस्यावधे र्वा ।
विन्यस्यन्ती भुवि गणतया देहलीदत्तपुष्पैः ॥
मत्संगं वा हृदयनिहितारम्भमास्वादयन्ती ।
प्रायेणैते रमणविरहेष्वंगनानां विनोदाः ॥ २४ ॥
 
भाषान्तर•
 
किंवा आतां कितिक अजुनी राहिला शापकाल ।
हें पुष्पीं भूवरति गणितां देहलीच्या दिसेल ॥
मत्संगाचा हृदयिं अथवा चाखितांना प्रमोद ।
ऐसे होती विरहिं बहुधा अंगनांचे विनोद ॥ ३२ ॥
 
मूलश्लोक.
 
सव्यापारामहति न तथा पीडयेद्विमयोगः ।
शङ्के रात्रौ गुरुतरशुचं निर्विनोदां सखीं ते ॥
मत्संदेशैः सुखयितुमलं पश्य साध्वीं निशीथे ।
तामुन्निद्रामवनिशयनां सौधवातायनस्थः ॥ २५ ॥
 
भाषान्तर.
 
काढी ऐसा दिन, परि तिला यामिनी जात नाहीं ।
लोळे भूमीवरि, तिज नसे नीज ही तेविं पाहीं ॥
 
ह्मणून
 
१. उंबऱ्यावर ठेवलेल्या. हें 'पुष्पीं' याचें विशेषण. दिवसांची
किंवा दुसऱ्या कशाचीही संख्या लक्ष्यांत राहावी बायका
सुपाऱ्या, माळेचे मणी, गंधाची बोटें, फुले यांचा उपयोग करतात.
या लौकिक व्यवहाराकडे येथें कवीचें लक्ष्य आहे. २. 'हृदयि मत्सं-
गाचा प्रमोद चाखितांना' असा अन्वय. मानससंगाचा आनंद
अनुभवीत असतां असा अर्थ 3. करमणुकीचे प्रकार. ४. वर सां-
गितलेल्या उद्योगामध्यें. ५. रात्रं.