This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-उत्तरमेघ.
 
भाषान्तर•
 
नेत्रांलागी रडुन रडुनी सूज आली असेल ! ।
उष्णश्वासें फिकटहि तिचा ओंठ झाला दिसेल ! ॥
किंचित् गालावरि विखुरले कुंतलांचेंहि जौल ।
ऐसें हातावरि मुख तिनें टेंकिलेलें असेल ! ॥ २९ ॥
तें भासेल, प्रियजलधरा, फार तैं दीनवाणें ।
त्वेत्संरोधें मलिन दिसैत्या चंद्रबिंबाप्रमाणें ! ।
मूलश्लोक.
 
आलोके ते निपतति पुरा सा बलिव्याकुला वा ।
मत्सादृश्यं विरहतनु वा भावगम्यं लिखन्ती ॥
पृच्छन्ती वा मधुरवचनां सारिकां पंजरस्थां ।
कच्चिद्भर्तुः स्मरसि रसिके त्वं हि तस्य प्रियेति ॥ २२ ॥
 
भाषान्तर.
 
मित्रा, तेथें बघशिल तिला देवतां पूजितांना ।
किंवा माझी कशतनु मनीं ध्याउनी लेखिँतांना ॥
मैनेला वा पुसत असतां 'काय बाई प्रियाची ।
होते तूतें अठवण मनीं ? लाडकी तूं तयाची' ! ॥ ३० ॥
मूलश्लोक.
 
५१
 
उत्संगे वा मलिनवसने सौम्य निक्षिप्य वीणाम् ।
मगोत्रांकं विरचितपदं गेयमुद्गातुकामा ॥
तन्त्रीमा नयनसलिलैः सारयित्वा कथंचिद् ।
भूयो भूयः स्वयमपि कृतां मूर्च्छनां विस्मरन्ती ॥ २३ ॥
 
भाषान्तर
 
किंवा अंकी मेलिनवसनीं, रम्य वीणा धरोनी ।
गाया लागे मजविषयिंचीं गोड गीतें रचोनी ॥
 
१. जाळें. २. तुंं आड आल्यामुळे. 3. दिसणाऱ्या, ४. काढीत अस
तां.।५. मांडीवर. ६. मळकें आहे वस्त्र ज्याचें अशा. विरहिणी पतिव्रता स्त्रि-
चा पति प्रवासास गेला असतां चांगली वस्त्रे, अलंकार वगैरेचा उपभोग
घेत नाहींत या गोष्टीस अनुलक्षून 'मलिनवसनी' हैं पद घातले आहे.