This page has not been fully proofread.

3
 
मेघदूताचें समवृत्त
 
डोळ्यामध्यें चकितहरिणीसारिखें होय पाणी ।
ओणीभारें गंजगति, तनू नम्र झाली स्तनांनीं ॥
बेचोनीया विभव मँतिचें सर्व त्या धातयानें ।
जाणों केली ! बघशिल अशी सुंदरी ईक्षणानें ॥ २६ ॥
मूलञ्जोक
 
तां जानीथाः परिमितकथां जीवितं मे द्वितीयं ।
दूरीभूते मथि सहचरे चक्रवाकीमिवैकाम् ॥
गाढोत्कंठां गुरुषु दिवसेष्वेषु गच्छत्सु बालां ।
जातां मन्ये शिशिरमथितां पद्मिनीं वान्यरूपाम् ॥ २०॥
 
भाषान्तर.
 
तीच प्राणप्रिय सहचरी ! तीच माझा विसावा ! ! ।
बाहेरील प्रियतम मम प्राण तेवीं सँहाबा!!! ॥
मेघा मारी परिमित तिचें बोलणें होय जाण ।
माझ्या दुःखें बहुत झुरते चक्रवाकीसमान ॥ २७ ॥
वाटे वर्षासम दिन तिला अंतरी एक एक ।
कंठी डोळे मिटुनि सखया तो परी तेथ देख ॥
लामोनीया हिमैकण वनीं पद्मिनी होय जेवीं ।
बारंवार स्मरुनि मज ती जाहली म्लान तेवीं ! ॥ २८ ॥
मूलश्लोक.
 
नूनं तस्याः प्रबलरुदितोच्छूननेत्रं प्रियाया ।
निःश्वासानामशिशिरतया भिन्नवर्णाधरोष्ठम् ॥
हस्तन्यस्तं मुखमसकलव्यक्ति लम्बाळकत्वा ।
दिन्दोर्दैन्यं त्वदनुसरणक्लिष्टकांते बिभर्ति ॥२१॥
 
१. गजासारखी आहे गति जिची अशी; अर्थात् मन्दुगमना.
 
२. ' नम्र झाली ' ह्मणजे वांकली. 3. खर्च करून.
(सर्वस्व. ) ५. सहावा बाहेरील प्राण' असा अन्वय, पंचप्राण
 
४.
 
बुद्धीचें
 
6
 
आंत असतात. हा बाहेर खेळणारा प्रत्यक्ष प्राणच म्हणून यास
सहावा बाहेरचा प्राण असें म्हटले आहे. ६. दंवाचे बिंदु.