This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-उत्तरमेघ.
 
मूलश्लोक.
 
गत्वा सद्यः कलभैतनुतां शीघ्रसंपातहेतोः ।
क्रीडाशैले प्रथमकथिते रम्यसालौ निषण्णः ॥
अर्हस्यन्तर्भवनपतितां कर्तुमल्पाल्पभासं ।
खद्योतालीविलसितनिभां विद्युदुन्मेषदृष्टिम् ॥ १८ ॥
 
भाषान्तर.
 
जातां यावें सहज तुजला आंतमध्यें ह्मणोनी ।
तूं हत्तीच्या चपलशिशुसें अंग तैं आवरोनी ॥
क्रीडाशैलावरति सखया बैस त्या जाउनीया
शृंगें त्याची बहु झळकतीं कांतिनें मेघराया ॥ २३ ॥
जें तेजाची चमक मधुनी दावितें मंदमंद ।
खैयोतालीपरि विलसतें कांतिनें जें पयोदें ॥
ऐसें विद्युन्नयन तिथुनी नीट माझ्या घरांत ।
फेंकोनीया बच निरखनी तेधवां तूं तयांत ॥ २४ ॥
मूलश्लोक.
 
सन्वी श्यामा शिखरिदशना पक्कबिंबाधरोष्ठी ।
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभिः ॥
श्रोणीभारादलसगमना स्तोकमत्रा स्तनाभ्यां ।
या तत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्यैव धातुः ॥ १९ ॥
 
भाषान्तर •
 
तारुण्याच्या अभिनवमदें कोमलांगी विराजे ।
दंतेश्रेणी बदर्नकमलीं हीरँकाकार साजे ॥
झाला बिंबासदृश पिकल्या खालचा ओंठ लाल ।
आहे भारी कृश कटितंटी, होय नाभीहि खोल ॥ २५ ॥
 
४९
 
१. चपळ छाव्यासारखें. २. शिखरें. ३. काजव्यांच्या पंक्ती-
प्रमाणें. * हें संबोधन आहे. हे पयोदा, असा अर्थ. ४. वीजरूपी
डोळा. ५. दंतपंक्ति. ६. मुखरूप कमलांत. ७. हिरकण्यांसारखी.
तोंडल्यासारखा . ९. कंबर.