This page has not been fully proofread.

प्रस्तावना:
 

 
मार्मिक वाचकांस या काव्यांत सांपडणार नाहीं असें नाहीं
उदाहरणार्थः-
'शिशावातः प्रियतम इव प्रार्थनाचाटुकारः '
'पूर्वोद्दिष्टामनुसरपुरीं श्रीविशालां विशालाम् '
'हारांस्तारांस्तरलगुटिकान् कोटिशः शंखशुक्तीः ?
'पश्चाद्रिग्रहणगुरुभिर्गर्जितैर्नर्तयेथाः '
'क्षेत्रं क्षत्रप्रधनपिशुनं कौरवं तद्भजेथाः '
'विद्युत्वन्तं ललितवनिताः सेन्द्रचापं सचित्राः '
'अंगेनांग प्रतनु तनुना गाढततेन ततम् '
 
या उदाहरणांत मोठ्या अक्षरांमध्यें छापलेल्या अक्षरांची आ-
वृत्ति चमत्कारिक रीतीनें आली आहे ह्मणून तीं सगळीं श्रवण-
समकाल कानाला गोड लागतात. असें जरी आहे तरी ज्या ठि-
काणीं वरील चरण आलेले आहेत त्या ठिकाणी अशा
शब्दाचित्रानें अर्थाची हानि मुळींच झालेली नाहीं हें लक्ष्यांत
ठेवण्यासारखें आहे. शिवाय साहित्यशास्त्रोक्त खण्डिता, स्वाधीन-
पतिका इत्यादि नायिका व अनुकूल, शठ इत्यादि कांहीं विशिष्ट
प्रकारचे नायकहि यांत प्रसंगविशेषीं कवीनें ध्वनित केले आहेत.
 
मेघदूतामध्यें कवीनें यक्षाच्या मुखानें रामगिरीपासून अलके-
पर्यंत मार्ग वर्णिलेला आहे. या मार्गामध्यें असणारे
प्रसिद्ध देश, नद्या, पर्वत, तीर्थे, देवस्थानें इत्यादिकांची माहिती क-
वीनें कथाप्रसंगानें दिली आहे. तिच्यावरून त्याचें सूक्ष्म अवलोकन
व त्याचें भरतखंडाच्या नैसर्गिक स्थितीचें व त्यांतील भिन्नभिन्न
देशाचारांचें ज्ञान, हीं व्यक्त होतात. रघुवंशाच्या तेराव्या सर्वांत
रामचंद्र जानकीसह पुष्पकविमानांत बसून आकाशमार्गानें
लंका सोडून अयोध्येकडे जात असतां लंकेपासून सरयूनदी पर्यंत
मार्गांतील प्रसिद्ध स्थलें याच कवीनें रामचंद्राकडून जानकीस
दाखविलीं आहेत. त्यावरूनहि वरील अनुमानाला जास्त बळकटी
येते. मेघाला सांगितलेल्या मार्गाचा नकाशा तयार करून तो या