This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
मूलश्लोक.
 
तन्मध्येच स्फटिक फलका कांचनी वासयष्टिः ।
मूले बद्धा मणिभिरनतिप्रौढवंशप्रकाशैः ॥
तालैः सिंजदूलय सुभगैर्नर्तितः कांतया मे ।
यामध्यास्ते दिवसविगमे नीलकण्ठः सुहृद्वः ॥ १६ ॥
 
-
 
भाषान्तर.
 
सोन्याची त्यांमधिं, जलधरा, वासयष्टी विराजे ।
खालीं तीच्या स्फटिक, भंवतीं पांचपंक्तीहि साजे
सायंकाळीं तिजवरि बसे आमुचा नित्य मोर ।
ज्याला होतो निरखुनि तुह्मां अंतरीं हर्ष थोर ॥ २१ ॥
होई मंजुध्वनि हलुनिया कंकणें ज्यांसमेत ।
ऐशा तालीं शिकवि दयिता नृत्य त्यालागि तेथ ॥
मूलश्लोक.
 
एभिः साधो हृदयनिहितैर्लक्षणैर्लक्षयेथाः ।
द्वारोपांते लिखितवपुषौ शंखपद्मौ च दृष्ट्वा ॥
क्षामच्छायं भवनमधुना मद्वियोगेन नूनं ।
सूर्यापाये न खलु कमलं पुष्यति स्वामभिख्याम् ॥ १७॥
 
भाषान्तर.
 
चित्तामाजीं पटवुनि घना सर्व खाणाखुणा या ।
तैशा दारावरिल बघुनी शंखैपद्मांस ही त्या ॥
लक्ष्यामध्यें मम गृह तुझ्या पूर्ण येईल वाटे ।
जें येवोनी अतिशय मनीं माझिया दुःख दाटे ॥ २२ ॥
तें यावेळीं तर मजविणें फार आहे उदास ।
होतो सूर्याविण वद कसा पंकजाचा विकास ? ॥
 
१. बकुल व अशोक या दोन वृक्षांमध्यें. २. उभे राहण्याची काठी
किंवा फळी. ३. मेघांना. मेघदर्शनानें मोरांना आनंद होतो हैं प्रति-
द्ध आहे.
४ ' ज्यांसमेत कंकणें हलुनिया मंजुध्वान होई ऐशा ताली
दुयिता त्यालागि तेथ नृत्य शिकवी' असा अन्वय. ५. शंख, पद्म
वगैरे नवनिधींची चित्रें दारावर काढलेली असतील त्यांस.