We're performing server updates until 1 November. Learn more.

This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर - उत्तरमेघ.
 
भाषान्तर•
 
राहे क्रीडागिरि, वरि तया वापिच्या, एक पाहीं ।
त्याचें आहे शिखर रचिलें रम्य नीला मण्यांहीं ॥
मोठ्या मोठ्या कनकैकदली शोभती त्यासभोंतीं ।
तच्छोभा ती ह्मणुनि सुभगा दृष्टिला तुष्टि देती ॥ १९ ॥
वियूँयुक्ता बघुनि तुजला तोच चित्तांत येतो ।
आहे कौन्ताप्रिय ह्मणुनिया हर्षखेदोंस देतो ॥
मूलश्लोक.
 
रक्ताशोकश्वलकिसलयः केसरश्वात्रकांतः ।
प्रत्यासन्नौ कुरबकवृतेर्माधवीमण्डपस्य ॥
 
एक: संख्यास्तव सह मया वामपादाभिलाषी ।
कांक्षत्यन्यो वदनमदिरां दोहदछद्मनास्याः ॥ १५ ॥
 
भाषान्तर•
 
मध्यें नामी गृह विलसतें मालतीच्या लतांचे ।
त्याच्या भोंती कुर्रबकतरु लागले अल्प साचे ॥
त्या कुंजीच्या जवळिंच तरू दोन आहेत एक ।
त्यांतोनीया बकुल, दुसरा तांबडा तो अशोक ॥ २० ॥
मत्कांतेची वदने॑मदिरा इच्छितो एकै फार ।
तैसे तीचे मजसम दुजा वौमैपादप्रहार ! ॥
 
3
 
१. क्रीडापर्वत, २. निळ्या; इंद्रनीलाच्या. ३. सोनकेळी. ४.
विजेसह असणाऱ्या. ५. क्रीडागिरि 'तोच चित्तांत येतो' ह्मणजे
त्याचीच आठवण होते. ६. बायकोचा आवडता. ७. कान्तेच्या आ
वडीची वस्तु दिसली ह्मणून हर्ष व तिच्या ( कांतेच्या ) विरहाची
आठवण तिनें ( त्या वस्तूनें ) करून दिली ह्मणून खेद. ८. कुरब-
काचीं झाडें. चिपळूणकर यांनी त्यांच्या भाषांतरांत याचें ' गुलाब'
या शब्दानें भाषान्तर केलें आहे. गुलाब मूळचा आपल्या देशांतला
नाहीं. ९. लतामंडपाच्या. १०. तोंडांतील मद्य. ११. बकुल. बकु
लावर मानिनी स्त्रियांनी मद्याच्या गुळण्या टाकल्या ह्मणजे त्याला
फुलें येतात असें कवि मानितात. १२. डाव्या पायानें ताडन. तरु-
णींनीं अशोकाला डाव्या पायानें प्रहार केले ह्मणजे तो फुलतो अशी
प्रसिद्धि आहे.