This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
जैथें कामी नवनिधिधनी गोड गोष्टी करीत ।
वैभ्राजाख्यीं बहिरुपवनीं प्रीतिनें क्रीडतात ॥ ३१ ॥
मूलश्लोक.
गत्युत्कंपादलकपतितैर्यत्र मन्दारपुष्पैः ।
 
पत्रच्छेदैः कनककमलैः कर्णविभ्रंशिभिश्च ॥
मुक्ता जालैः स्तनपरिसरच्छिन्नसूत्रैश्च हारै-
नैशो मार्गः सवितुरुदये सूच्यते कामिनीनाम् ॥ ९ ॥
 
भाषान्तर.
 
ठायीं ठायीं दयितैभवनां चोरुनी संभ्रमानें ।
जातां बेण्यांमधुनि पईंलीं कल्पवृक्षप्रसूनें ॥
कर्णप्राँन्तावरुनि ढळली अंबुजें स्वर्णवर्णे ॥
लागोनीया पवन, गळलीं, पत्रापल्लीसुपर्णे ॥ १२ ॥
मुक्ताजालें, स्तनपरिचयें तेविं भंगोनि हार ।
कोठें कोठें बहु बिर्खुरलीं मौक्तिकें दिव्य फार ॥
प्रातःकालीं सुचवितिल हीं सर्व चिन्हें मनाला ।
कीं रात्रीचा तिथुनि तरुणीगुप्तसंचार झाला ॥ १३ ॥
 
मूलश्लोक.
 
मत्वा
 
देवं धनपतिसखं यत्र साक्षादूसंतं ।
मायश्चापं न वहति भयान्मन्मथः षट्पदज्यम् ॥
सम्रभंगम हितनयनैः कामिलक्ष्येष्वमोघै।
स्तस्यारंभश्चतुरवनिताविभ्रमैरेव सिद्धः ॥ १० ॥
 
त्यांची
 
१. ज्या अलकेंत. २. शंख पद्म वगैरे नऊ निधींचे
मालक. ३. वैभ्राज नांवाच्या. ४. बाहेरच्या बागेंत. ५. प्रियाच्या
घरांप्रत. ६. हीं भूतभूतकालवाचक विशेषणे आहेत.
विशेष्य त्यांच्या पुढील पदें होत. ७. कानावरून. ८. कमळें.
९. सोन्याच्या रंगाचीं. १०. पत्रपल्लीनांवाच्या लतेची सुंदर पानें.
११. मोत्यांचीं जाळीं. १२. स्तनांशी घर्पण झाल्यामुळे. १३. तरुण
स्त्रियांचें गुप्तरीतीनें फिरणें.