This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-उत्तरमेघ-
भाषान्तर.
 
यत्सौधायीं तुजसम निळे मेघ बारा सहाय ।
घेवोनीया जमुनि करिती तेथ चित्रां अपाय ॥
 

 
वर्षोनीया; मग जणुं भये॑ ते धुराच्या मिषानें ।
बाहेरी, गा, पडति खिडक्यांतोनि चोरांप्रमाणें ! ॥ ९ ॥
मूलभोक.
 
यत्र स्त्रीणां प्रियतमभुजालिङ्गनोच्छ्रासिताना ।
मङ्गग्लानिं सुरतजनितां तन्तुजालावलंबाः ॥
त्वत्संरोधापगनविशदैश्चन्द्रपादैनिशीथे ।
 
व्यालुम्पन्ति स्फुटजललवस्यन्दिनश्चन्द्रकान्ताः ॥ ७ ॥
 
भाषान्तर•
 
क्रीडारंगीं, जिथ, पतिचिया गाढ आलिंगनांनीं ।
अंगीं आला बहुत थकवा दूर व्हावा ह्मणोनी ॥
कंठीं माला वरिति युवती, ज्यांतले चन्द्रकांत ।
शीतांशूंच्या विमलेकिरणीं आई होती नितांत ॥ १० ॥
मूलश्लोक.
अक्षय्यान्तर्भवननिधयः प्रत्यहं रक्तकंठै-- ।
रुद्रायद्भिर्धनपतियशः किन्नरैर्यत्र सार्धम् ॥
वैभ्राजाख्यं विबुधवनितावारमुख्यासहाया ।
बद्धालापा बहिरुपवनं कामिनो निर्विशन्ति ॥ ८ ॥
 
भाषान्तर.
 
गाँती यक्ष-स्तुतिपर पढ़ें मंजु गंधर्व, त्यांचे ।
मेळे तैसे मिळवुनि मदोन्मत्तदेवांगनांचे ॥
 
१. ज्या अलकेच्या वाड्यांच्या वरील भागांवर. २. भामटे लोक
कोणी तरी साथीदार गांठून कांहीं तरी उचलून नेण्याकरितां एकाद्या
घरांत नकळत शिरतात आणि कार्यभाग झाला ह्मणजे चोरून लपून
घराबाहेर पडतात हा लौकिक अर्थ कर्वानें मेघासंबंधानें या श्लोकांत
चमत्कारिक रीतीनें सुचविला आहे! 3. चन्द्रकांत मणी. ४. चंद्रा-
च्या. ५. स्वच्छ चांदण्यानें. ६. अतिशय ७. याचा कर्ता ' ' (जे)
गंधर्व '. ८. सुस्वर. ९. याचा संबंध 'मेळे' या पदाशीं.