This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
अन्वेष्टव्यैः कनकसिकतामुष्टिनिक्षेपगूढैः ।
 
संक्रीडन्ते मणिभिरमरमार्थिता यत्र कन्याः ॥ ४ ॥
 
भाषान्तर.
 
गंगातीरीं सुरतरुतळीं वाहतां थंड वारे ।
कन्या देवार्थित विहरती जेथं नानाप्रकारें ॥
कोणी कोणी लिकबिति करीं स्वर्णवाळूंत रत्नें ।
कोणी कोणी मग चहुंकडे शोधिती त्यांस यत्नें ॥ ७ ॥
मूलश्लोक.
 
नीवीबंधोच्छ्रसितशिथिलं यत्र बाधराणां ।
क्षौमं रागादनिभृत करेष्वाक्षिपत्सु प्रियेषु ॥
अर्चिस्तुंगानभिमुखमपि प्राप्य रत्नप्रदीपान् ।
हीमुढानां भवति विफलप्रेरणा चूर्णमुष्टिः ॥ ५ ॥
 
भाषान्तर.
 
झालेलें जें सुटुनि निरिची गांठ थोडें ढिलं तें ।
वस्त्र, प्रेमें प्रियतम जवें ओढितौं स्वीयर्हस्तें ॥
लाजोनीया भरभर मुठी फेकिती कुंकुँमाच्या ।
मुर्धौ नारी, जिथं, विझविण्या रत्नदीपांस साच्या ! ॥८॥
मूलश्लोक.
 
नेत्रा नीताः सततगतिना यद्विमानाग्रभूमी ।
रालेख्यानां नवजलकणै दर्दोषमुत्पाद्य सद्यः ॥
शंकास्पृष्टा इव जलमुचस्त्वादृशो जालमार्गे- ।
धूंमोद्गारानुक्कृतिनिपुणा जर्जरा निष्पतन्ति ॥ ६ ॥
 
अप्रौढ,
 
१. हैं ' कन्या ' याचें विशेषण. देवांनी ज्यांचा अभिलाप केला
आहे अशा. २. ज्या अलकेंत. ३. जे वस्त्र. ४. वेगानें, ५. ओढीत
असतां. ६. आपल्या हातानें. ७. गुलाल वगैरेच्या.
अल्लड. ९. ज्या अलकेंत. १०. रत्नरूप दीपांस. रत्नदीप सामान्य
दिव्यासारखे मालवितां येत नाहींत. असें असून या पुरींतील स्त्रिया
आपल्या प्रियांनी वस्त्र ओढलें असतां लज्जावश होऊन रत्नदीप
विझविण्याकरितां त्यांवर गुलालाच्या मुठी उधळतात !