This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त,
 
भाषान्तर.
 
जेथें हातीं धरिति युवती रम्य लीलारविन्दें ।
कुन्दाच्याही बसविति कळ्या कुंतलांत प्रमोदें ॥
नामी नामी कुरबर्केसुमें खोंविती वेणिमाजी ।
तेवीं कर्णावरति धरिती त्या शिरीपेंहि ताजीं ॥ ४ ॥
भांगामध्यें बसविति नवीं नीपपुष्पें, जयाला ।
येतो मोठा बहर जलदा, लागतां पावसाळा ॥
तेवीं लोध्रस्थित उडतसे वीयुसंगें पराग ।
तो लागोनी वदनिं विलसे त्यांचिया पीण्डुराग ॥ ५ ॥
मूलश्लोक. ( प्रक्षिप्त )
यत्रोन्मत्तभ्रमरमुखराः पादपा नित्यपुष्पा ।
हंसश्रेणीरचितरशना नित्यपद्मा नलिन्यः ॥
केकोत्कंठा भवति शिखिनो नित्यभास्वत्कलापाः ।
नित्यज्योत्स्नाः प्रतिहततमोवृत्तिरम्याः प्रदोषाः ॥ अ ॥
 
भाषान्तर ( अ )
 

 
झाडें वेली फुलति, वरितीं सर्वदा ही फलांतें ।
त्यांच्या ठायीं मधुप करिती मंजु गुंजारवातें ॥
तेवीं मेघा सतत 'नैलिनी पंकजांहीं विराजे ।
कौंचीस्थानीं सुविमल तिच्या हंसमालाहि साजे ॥
प्रसादायीं, नवजलधरा, हर्ष पावोनि थोर ।
टाकोनीयां हळु हळु पढ़ें नाचती नित्य मोर ॥
नानारंगीं बहु विलसती रम्य त्यांचे पिसारे ।
रात्रीं नित्य प्रकटुाने शशी शोभवी प्रान्त सारे ॥ २ ॥
 
१. ज्या अलकेंत. २. तरुण स्त्रिया. ३. लीलाकमलें. ४. केशांत.
५. कुरबकाचीं फुलें. ६. शिरीपाची फुलें. ७. कळंचाची किंवा अशो-
काचीं फुलें. ८. लोध्रांच्या फुलांतील. ९. वायूच्या बरोबर. १०.
पाण्डुरवर्ण. ११. भ्रमर. १२ मंजुळ १३. कमललता. १४. कंचर-
पट्याच्या ठिकाणीं. १५. अतिशुभ्र. १६. वाड्यांच्या गच्यांवरून.
१७. भोंवतालचे प्रदेश.