This page has not been fully proofread.

प्रस्तावना.
 
नीची हुबेहुब व मोहक तसबीर हीं स्थलें वर सांगितलेल्या गु-
णांची उत्कृष्ट साक्ष देतील.
 
उत्तरमेघांत अलकावर्णन, यक्षमंदिराच्या खाणाखुणा, त्या-
च्या स्त्रीचें लावण्य व विरहावस्था आणि शेवटीं संदेशकथन,
यांपैकी प्रत्येक प्रसंग इतका चटकदार व बहारीचा वठला आहे
कीं, त्याच्या योगानें वाचकांच्या मनोवृत्ती उचंबळून जातील;
कविराजाच्या या अनुपम कृतीविषयीं त्यांस सप्रेम आनंद होईल;
आणि अशा आनंदाच्या लहरीवर लहरी अनुभवीत असतां
'क्षणे क्षणे यन्नवतामुपैति तदेव रूपं रमणीयतायाः' असे उद्गार
त्यांच्या मुखांतून वारंवार निघतील.
 
प्रस्तुत काव्यांचें संविधानक दुसरीकडे दिले आहे. कवीनें या
काव्यांत एका यक्षास नायक व त्याच्या स्त्रीस नायिको कल्पून
प्रथमश्लोकांतच त्यांचा वियोग केलेला आहे. आरंभी देवतानम-
स्करणरूप किंवा आशीर्वादात्मक मंगल न करितां त्यानें केवळ
चस्तुर्निर्देश केला आहे. या काव्यांतील प्रधानरस विप्रलंभशृंगार
असून तो फार कोमल, मधुर व मनोहर वठला आहे. काव्याचें
वृत्त मन्दाक्रांता असून तें विप्रलंभशृंगारास अतिशय अनुकूल
आहे. प्रस्तुत काव्यांत इतर अर्थालंकारांपेक्षां कवीनें स्वभावो-
क्तीचा विशेष उपयोग केला आहे त्यामुळे काव्याचें एकंदर स्वरूप
फारच रम्य व उज्वल झाले आहे. शब्दचित्राचाही चमत्कार
 
१. काव्यांत मुख्यत्वेंकरून ज्या पुरुषाचें वर्णन केलेलें असतें त्या पुरु
बास त्या काव्याचा नायक ह्मणतात. २. काव्यांत मुख्यत्वेंकरून ज्या
स्त्रीचें वर्णन केलेलें असतें, किंवा जी मुख्य नायकाची मुख्य स्त्री अथवा
ज्या स्त्रीविषयीं नायक अत्यंत आसक्त झालेला असतो, ती स्त्री नायिका
होय. ३. वस्तु ह्मणजे संविधानक किंवा नायक; त्याचा निर्देश जे
उल्लेख. ४. इंशृंगाररसाचे दोन भेद आहेत. एक संभोगशृंगार व दुसरा
विप्रलंभशृंगार. अनुरक्त विलासी स्त्रीपुरुषांनीं दर्शनस्पर्शनादि काम
व्यापारांत निमग्न असणें हा संभोगशृंगार होय. विरही स्त्रीपुरुषांचें पर-
स्परप्रेम उत्कट दशेस येऊन परस्परमनोरथ पूर्ण न झाल्यामुळे ज्या
मनोविकारांचें प्रकटीकरण होतें त्यांस विप्रलंभशृंगार ह्मणतात.