This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
तेवीं कल्पद्रुम॑किसलयां हालबीं मन्दवातें ।
 
तेथें लीला करुनि असल्या तोषवीं मानसातं ॥ ८० ॥
मूलश्लोक.
तस्योत्संगे प्रणयिन इव स्वस्तगंगादुकूलां ।
न त्वं दृष्ट्वा न पुनरलकां ज्ञास्यसे कामचारिन् ॥
या वः काले वहति सलिलोद्गारमुच्चैर्विमाना ।
मुक्ताजालग्रथितमलकं कामिनीबाभ्रवृन्दम् ॥ ६३
 
भाषान्तर.
 
मेघा जेवीं चतुरतरुणी आपुल्या वल्लभाच्या ।
उत्सँगीं, जी बहुत विलैसे तेविं अद्रीश्वराच्या ॥
गेलें गंगौवसनहि जिचें शुभ्र खालीं गळोनी ।
पाहें ऐशी दुरुनि अलका आपुल्या लोचनांनीं ॥ ८१ ॥
तीमाझारीं रुचिर भवनें शोभतीं, हे दयाळा, ।
गेलीं त्यांचीं सहज शिखरें भेदुनी अन्तराळा ॥
वर्षाकालीं शिरिं धरिर्तसे वर्षती मेघमाला ।
मुक्तांजालग्रथित युवती जेविं, मेघा, कचांला ॥ ८२ ॥
 
१. कल्पवृक्षाच्या पालवीस २ तरुणीपक्षी अंकावर; अलका-
पक्षी कटिप्रदेशावर. ३. या क्रियेस वरच्या चरणांतील 'तरुणी' व
या चरणांतील 'जी ' असे कर्ते आहेत. ४. या पदाचा संबंध
' उत्संगी ' या पदाकडे. ५. गंगाप्रवाहरूप वस्त्र. ६. याला 'अलका'
हा कर्ता अध्याहृत आहे. ७. वर्षणारी. ८. हें
(धारण करिते ) या क्रियापदाचें कर्म. ९. मोत्यांच्या जाळीनें गुंफ-
लेलें. हें 'कचांला' याचें विशेषण.
 
पद
 
'धरितसे '