This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
मूलश्लोक.
 
उत्पश्यामि त्वयि तटगते स्निग्धभिन्नांजनाभे ।
सद्यः कृत्तद्विरददशनच्छेदगौरस्य तस्य ॥
शोभामद्रेस्तिमितनयनप्रेक्षणीयां
 
भवित्री- ।
 
मंसन्यस्ते सति हलभृतो मेचके वाससीव ॥ ५९ ॥
 
भाषान्तर.
 
देह स्निग्धांजनसम तुझा श्यामरंगें विराजे ।
त्याला ताजा द्विरददैशनच्छेद पाहोनि लाजे ॥
त्वत्संयोगें तैटिं, रुचिर तो तेथ वाटेल शैल ।
जाणों आला हलधर निळें पांघरोनी स्वचैल ! ॥ ७७ ॥
मूलश्लोक.
 
हित्वा तस्मिन् भुजगवलयं शंभुना दत्तहस्ता ।
क्रीडाशैले यदि च विचरेत्पादचारेण गौरी ॥
भंगीभक्त्या विरचितवपुः स्तंभितांतर्जलौघः ।
सोपानत्वं कुरु मणितटारोहणायाग्रयायी ॥ ६० ॥
 
भाषान्तर:
 
टाकोनीया भुजगवलया शंभु दे हस्त जसिं ।
ऐशा तेथें बघाशल जरी चालतां पार्वतीस ॥
क्रीडाँशैलीं तरि मणितटों जावया त्यास मेघा ।
सोपानाच्यासम तनु करी थांबवोनी जलौघा ॥ ७८ ॥
 
93,
 
१. तुळतुळीत काजळासारखा. २. काळ्या रंगानें. 3.
हत्तीच्या दांताचा तुकडा. ४. तुझा संयोग झाल्यामुळे; तूं बसल्या-
मुळे. ५. तटावर. ६. बलराम. ७. आपलें वस्त्र. या श्लोकांत
मेघयुक्त कैलासपर्वतावर नीलवस्त्र परिधान केलेल्या बलरामाची
कल्पना केली आहे. बलरामाचा वर्ण गौर असून तो कृष्णवस्त्र परि-
धान करीत असे. ८. सर्परूप कंकणास शिव सर्पाचीं भूषणें
घालतो हैं प्रसिद्ध आहे. पार्वतीला भीति वाटूं नये म्हणून शंकरानें
सर्पवलयाचा त्याग केला असा भावार्थ. ९. ज्या पार्वतीस. १०.
ज्या कैलासावरील क्रीडापर्वतावर ११. इंद्रनील मण्यांनी खचिले -
ल्या शिखरावर. १२. जिन्यासारखी. १३. आपल्या उदरांतील पा
ण्याचा ओघ थांबवून.