This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ
 
हंसैद्वारांतुनि वरि यया उत्तरेलागि जाया ।
लागावें तूं त्वरितगतिनें यापुढें मेवराया ॥
जातां जातां दिसशिल तईं वांकुडा भव्य तेवीं ।
श्रीविष्णूचा बलिनियेमनीं श्याम तो पाढ़ जेवीं ॥ ७५ ॥
मूलश्लोक.
 
गत्वोचोर्ध्वं दशमुखभुजोच्छ्रासितप्रस्थसंधेः ।
कैलासस्य त्रिदशवनितादर्पणस्यातिथिः स्याः ॥
शृंगोच्छ्रायैः कुमुदविशंदेर्यो वितत्य स्थितः खं ।
राशीभूतः प्रतिदिनमिव त्र्यंबकस्याट्टहासः ॥ ५८ ॥
 
भाषान्तर.
 
त्यांतोनीया निघुनि वरतीं उंच जातां नभांत ।
लागे मार्गामधिं जलधरा शैल कैलास कांत ॥
त्याचे सांधे करि खिळखिळे रावण स्वीयहस्तीं ।
आदेशीच्या सम सुरवधूही जया मानिताती ॥ ७६ ॥
तो शृंगांहीं कुमर्दंविशदीं व्यापितां अंबरास ।
वाटे राहे जमुनिच उभा शंभुचा अट्टहास ! ॥
 
१.
 
3.
 
. आतां निर्दिष्ट केलेल्या विवरांतून. २. बलिदैत्याला पाताळी घातलें
त्या वेळीं. वामनावतारीं विष्णूनें दोन पावलांनी स्वर्ग आणि मृत्यू हे
दोन लोक व्यापून टाकिले व तिसऱ्या पावलास जागा नसल्यामुळे
तें लांचवून बळीच्या डोक्यावर ठेवून त्यास पाताळांत घातले अशी
कथा आहे. मेघाच्या काळ्या रंगावरून व लांबट शरीरावरून त्यास
बलिनियमनाच्या वेळच्या विष्णुपादाची उपमा दिली आहे.
सुंदर. ४. रावणानें आपल्या सामर्थ्याने एका काली कैलास-
पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला होता असें पुराणांतून वर्णन आढ-
ळतें. ५. कैलासावर नेहमी बर्फ असल्यामुळे तो शुभ्र व चकचकीत
दिसतो यास्तव त्यास देवांगनांच्या आरशाची उपमा दिली आहे.
६. चंद्रविकासी कमलांप्रमाणें शुभ्र अशा. हे 'शृंगांहीं' याचें विशे-
पण. ७. शिवाचें हास्य. या ठिकाणी कैलासावर शंकराच्या हास्याची
कल्पना केली आहे. कारण कैलास हिमाच्छादित असल्यामुळे शुभ्र
असतो व हास्याचा रंग शुभ्र आहे असे मानण्याचा कवींचा संप्र-
दाय आहे.