This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
दुःखार्तांचं शमन करणें दुःख हें मुख्य एक ।
संपत्तीचें फल समजती आपुल्या थोर लोक ॥
मूलश्लोक.
 
ये संरभोत्पतनरभसाः स्वांगभंगाय तस्मि ।
न्मुक्ताध्वानं सपदि शरभा लंघयेयुर्भवन्तम् ॥
तान् कुर्वीथास्तुमुलकरकावृष्टिपातावकीर्णा- ।
न्केवा नस्युः परिभवपदं निष्फलारंभयत्नाः ॥ ५४ ॥
 
भाषान्तर.
 
त्या शैलीं जे शरभ अपुलें अंग मोडोनि ध्याया ।
क्रोधावेशें बघतिल तुला आडवे तेथ याया ॥
गारांनीं तैं सडकुनि करी त्रस्त त्यो एकवार ।
कार्या निष्कारण करिति जे ते न कीं भूमिभार ? ॥ ७१ ॥
मूलश्लोक.
 
तत्र व्यक्तं दृषदि चरणन्यासमर्धेन्दुमौलेः ।
शश्वत्सिद्धैरुपचितबलिं भक्तिनत्रः परीयाः ॥
यस्मिन् दृष्टे करणविगमादूर्ध्वमुद्धृतपापाः ।
संकल्पन्ते स्थिरगणपदमाप्तये श्रद्दधानाः ॥ ५५ ॥
 
भाषान्तर•
 
पाषाणांच्यावर उमटलीं पाउलें श्रीशिवाचीं ।
सिद्धांनीं जीं सतत असतीं पूजिलेलीं हि साचीं ॥
वंदीं त्यांतें फिरुनि भ॑वतीं; तीं अवा जाळितात ।
भक्तालागीं परंपद तँनु त्यागितां वोपितात ॥ ७२ ॥
 
याचें व
 
१. हा एक आठ पायांचा वनपशु आहे.
हत्तीचें स्वभावतःच वैर आहे. नीलवर्ण मेघ पाहून गजाच्या भ्रा-
न्तीनें शरभ त्याच्यावर हल्ला करण्यास तयार होतीले अशी कल्पना
कवनें येथें केली आहे. २. यावयास. ३. ' भंवतीं फिरुनि ( प्रद-
क्षिणा करून ) त्यांतें (शिवाच्या पावलांतें ) वंदी' असा अन्वय.
प्रदक्षिणा हा शब्द मन्दाकान्ता वृत्तांत बसत नाहीं लणून तो अर्थ
दुसऱ्या रीतीनें कसा तरी आणण्याचा प्रयत्न केला आहे. ४. मोक्ष
५. देह सोढल्यावर, मृत्यूनंतर. ६. देतात.