This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
तारायातें सगरतैनयां स्वर्गसोपान झाली ॥ ६६ ॥
 
कोठोनी ही सवत असली बाइ ! राशीस आली ।
या भावानें भ्रुकुटि चंढवी शैलँकन्या कपाळीं ॥
धिक्कारोनी जणुं बहुत ती फेर्नैहास्यें तयांस ।
त्या शंभूच्या विधुँसह धरी वीचिहँस्ती जटांस ॥ ६७ ॥
मूलश्लोक.
 
(
 
तस्याः पातुं सुरगज इव व्योम्नि पश्चार्धलंबी ।
त्वं चेदच्छस्फटिकविशदं तर्कयेस्तिर्यगंभः ॥
संसर्पन्त्याः सपदि भवतः स्रोतसि च्छाययाऽसौ ।
स्या दस्थानोपगतयमुनासंगमेवाभिरामा ॥ ५१ ॥
 
३१
 
भाषान्तर.
 
त्या गंगेचें जल सुरगजासारिखें प्यावयास ।
पूर्वांगतें नमवुनि नभामाजि तूं वांकलास ॥
छाया त्याच्यामधिं तरि तुझी पूर्ण बिंबेल काळी ।
कीं अस्थांनीं तपनतैनया जान्हवीला मिळाली ! ॥ ६८ ॥
 
१. सगराच्या मुलांस. सूर्यवंशामध्यें सगर या नांवाचा एक राजा झा-
ला. त्याला साठ हजार पुत्र होते. त्यांस कपिलमुनीनें कांहीं अपराध के-
ल्यावरून जाळून भस्म केले. त्यांचा उद्धार करण्याकरितां सगराच्या वंशां-
तील भगीरथ
नांवाच्या राजानें मोठी तपश्चर्या करून गंगेला मृत्युलोकीं
आणिलें व तिच्या योगानें आपल्या पूर्वजांचा उद्धार केला; अशी
कथा भागवतांत नवमस्कंधी वर्णन केली आहे. सगरराजाच्या
मुलांस स्वर्गास जाण्यास गंगा साधन झाली ह्मणून तिला ' स्वर्ग-
सोपानपंक्ति ' असें ह्नटलें आहे. २. स्वर्गाला जाण्याचा जिना.
३. पार्वती ४. सरूपी हास्यानें. ५. चंद्रासह. ६. लाटारूप
तिनेंही
 
हातांनीं. गंगेकडे पार्वतीनें सवतमत्सराने पाहिलें यामुळे
तिचा परिहासपूर्वक धिक्कार केला असा चमत्कारिक अर्थ या पद्यांत
कवीनें बांधला आहे ! ७ दिग्गजासारखें. ८. शरीराच्या पुढच्या
अंगास. ९. भलत्याच किंवा दुसऱ्या ठिकाणीं. गंगा आणि यमुना
यांचा प्रयागास झालेला संगमच प्रसिद्ध आहे. हे मेघा, तुझें काळें
बिंब भागीरथीच्या शुभ्र प्रवाहांत पडून प्रयागाहून अन्य ठिकाणी
झालेल्या गंगायमुनेच्या संगमाची त्यास शोभा येईल असा यक्षा-
च्या बोलण्याचा भाव. १०. सूर्याची मुलगी, यमुना. ११. गंगेला.