This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
कृत्वा तासामभिगममपां सौम्य सारस्वतीना-
मन्तःशुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्णः ॥ ४९ ॥
 
भाषान्तर•
 
कांतानेत्रांकित मधु हैली आवडीचें त्यजोनी ।
बंधुप्रेमें रणविर्मुख, जें प्राशिता होयं रानीं ॥
पी तें सारस्वत सलिल, हो अंतरीं शुद्ध पूर्ण ।
बाहेरोनी दिसशिल जना मात्र तूं कृष्णवर्ण ! ॥ ६५ ॥
मूलश्लोक.
 
तस्माद् गच्छेरनुकनखलं शैलराजावतीर्णा ।
जन्होः कन्यां सगरतनयस्वर्ग सोपानपंक्तिं ॥
गौरीवक्त्रभ्रुकुटिरचना या विहस्येव फेनैः ।
शंभोः केशग्रहणमकरोदिंदुलनोर्मिहस्ता ॥ ५० ॥
 
भाषान्तर.
 
तेथोनीया कनखँलनगा पाततां तूं पुढारा ।
दृष्टीलागी निवविल तुझ्या जान्हवीवारिधारा ॥
ती लीलेनें गिरिवँरशिरापासुनीया निवाली ।
 
मद्य.
 
१. कान्ता जी रेवती तिच्या नेत्राची प्रतिबिंबें ज्यांत
पडली आहेत असें. हैं ' मधु ' या पदाचें विशेषण. २.
3 बलराम. ४. कौरव व पाण्डव यांचें परस्परांशीं
चुलतभावांचें नातें असून ते बलराम व कृष्ण यांचे आते-
भाऊ होते. शिवाय बलराम व कृष्ण यांचें कौरवांशी व्यायाचें
नातें. असून बलराम हा गदायुद्धासंबंधानें दुर्योधनाचा गुरु होता.
यामुळे बलरामाच्या मनांत कौरवपांडवांविषयीं बंधुप्रेम वसत होतें.
५. कौरव व पाण्डव यांमधील युद्धाविषयीं पराङ्मुख किंवा उदासीन.
कृष्णानें पाण्डवांचा पक्ष स्वीकारला हे पाहून बलरामास वाईट वाटून
त्यानें भारतीय युद्धाच्या वेळी कोणत्याही पक्षास न मिळतां तीर्थ-
यात्रा करीत दिवस काढले. या गोष्टीस अनुलक्षून येथें वर्णन आलें
आहे. ६. सरस्वती नदीचें. ७. कनखल पर्वताला. ८. भागीरथीच्या
पाण्याचा प्रवाह. ९. हिमालयाच्या शिखरापासून.