This page has been fully proofread once and needs a second look.

प्रस्तावना.
 

 
कविकुलगुरु कालिदास याचीं रघुवंश आणि कुमारसंभव हीं

काव्यें व शाकुन्तल, विक्रमोर्वशीय इत्यादि नाटकें फार प्रसिद्ध

आहेत. माधुर्य, ओज व प्रसाद हे प्रधान काव्यगुण वरील ग्रंथांत

फार सरस रीतीनें उतरले आहेत; आणि ह्नणूनच ते ग्रंथ रसिक

पंडितांस अतिशय आवडतात. असो. त्याच कवीनें मेघदूत

नांवाचें एक लहानसें काव्य[^१] रचिलेले आहे. त्याचे पूर्वमेध व

उत्तरमेघ असे दोन भाग आहेत. त्याचें वृत्त त्यांतील रसास

अनुकूल आहे. त्यांतील संविधानक फार चमत्कारिक; पदरचना

अत्यंत कोमल व मधुर; अर्थ सरस व हृदयंगम, आणि अलंकार

प्रसिद्ध व मनोहर आहेत. या काव्यांत रसपरिपाक उत्कृष्ट

झाला आहे, यामुळें तें सहृदय वाचकास चटका लावल्याशिवाय

राहणार नाहीं.
 

 
पूर्वमेघांत मेबाघाचें रामगिरीपासून प्रस्थान; त्या प्रसंगी होणारे

मंगलप्रद शकुन; तेथून पुढें आम्रकूट पर्वतापर्यंत मार्गागीतील अनेक

चमत्कार; नंतर आम्रकूट, देवगिरि, नीचैः व हिमालय या पर्वतांचें

काढलेलें रमणीय व उदात्त चित्र; नर्मदा, भागीरथी, निर्विन्ध्या,

चर्मण्वती इत्यादि पुराणप्रसिद्ध व पवित्र नद्यांचें प्रसंगोपात्त सरस

वर्णन; महाकालेश्वर आणि कार्तिकस्वामी या अतिप्राचीन

देवतांचें गंभीर व पूज्यबुद्धि उत्पन्न करणारें स्वरूप; व उज्जयि-

 
[^
.] याला कोणी महाकाव्य ह्मणतात व कोणी खण्डकाव्य ह्मणतात.

पद्यात्मक काव्याचे महाकाव्य व खण्डकाव्य असे दोन भेद आहेत.

ज्यांत विषयाच्या अनुरोधानें सर्ग, स्तबक, गुच्छ किंवा भाग कल्पिलेले

असतात व त्यांतील प्रत्येकाच्या शेवटचीं कांहीं पद्यें पहिल्यापासून

चालत आलेल्या वृत्ताहून अन्यवृत्तांत रचलेलीं आढळतात व ज्यांत विष-

यवैचित्र्यहि आढळते॑तें त्यास सामान्यतः महाकाव्य ह्मणतात. ज्यांत एकच

विषय असून त्याचेंच एकसारखें वर्णन असते त्यास खण्डकाव्य ह्मणतात.