This page has not been fully proofread.

२८
 
मेघदूताचें समवृत्त
 
मित्रा मार्गामधिं मग नदी लागते रम्य भारी ।
वाटे कीर्ती दशपुरनृपाचीच ती देहधारी ॥
त्या राजानें अमित वधिल्या धेनु यज्ञांत मागें ॥
त्यांच्या चर्मांताने निठुनि ती भूतलीं वाहुं लागे ॥ ६१ ॥
या उत्पत्तीवरुनि वरिते नाम चर्मण्वती ते ।
थोडा खालीं उतरुनि तईं आदरें भेट तीतें ॥
मूलश्लोक.
 
त्वय्यादातुं जलमवनते शाणिो वर्णचौरे ।
तस्याः सिंधोः पृथुमपितनुं दूरभावात्प्रवाह ॥
प्रेक्षिष्यन्ते गगनगतयो नूनमावर्ज्य दृष्टी ।
रेकं मुक्तागुणमिव सुवः स्थूलमध्येन्द्रनीलम् ॥ ४६॥
 
भाषान्तर•
 
प्याया पाणी लव शिल घना कृष्णवर्णा तियेचें ।
तेव्हां त्याच्यामधिं तव निळें बिंब बिंबेल साचें ॥
ऐशा तीच्या निरखुनि नभांतूनि सिद्ध प्रवाहा
आश्चर्यानें ह्मणतिल, 'चमत्कार हो केवढा हा ! ॥ ६२ ॥
भूँदेवीचा विमलतर हाँ हार कीं मौक्तिकांचा ।
मध्यें ज्याच्या मणि विलसतो थोरला नील साचा ॥
 
१. दशपूरच्या ( रंतिदेव नांवाच्या ) राजाची. उज्जनीच्या
उत्तरेस दुसरा एक देश लागतो, त्याची राजधानी दशपूर शहर
असून तें चर्मण्वती ह्मणजे हल्लीं जिला चंचळ ह्मणतात तिच्यावर
वसलेलें होतें. त्या शहरालाच हल्लीं धोलपूर ह्मणतात असे दिसतें.
२. रंतिदेवानें यज्ञामध्ये गायी वगैरे पशु इतके मारले की त्यांच्या
रक्ताची एक नदीच वाहूं लागली; म्हणून या नदीला चर्मण्वती असे
नांव पडलें अशी कथा भारतामध्यें द्रोणपर्वीत आली आहे. 3. हे
कृष्णवर्णा घना ' असा अन्वय. ४. पृथ्वीरूप स्त्रीचा. ५. प्रवाह. या
श्लोकांत पृथ्वीवर स्त्रीची, चर्मण्वतीच्या अतिस्वच्छ प्रवाहावर
मोत्यांच्या हाराची व त्या प्रवाहांत पडलेल्या नीलवर्ण मेघप्रतिबिं
बावर नील मण्याची फारच मनोहर कल्पना केली आहे.