This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
मूलश्लोक.
 
ज्योतिर्लेखावलयि गलितं यस्य बर्हे भवानी ।
'पुत्रप्रेम्णा कुवलयदलमापि कर्णे करोति ॥
धौतापांगं हरशशिरुचा पावकेस्तं मयूरं ।
पश्चादद्रिग्रहणगुरुभिर्गर्जितैर्नर्तयेथाः ॥ ४४ ॥
 
भाषान्तर.
 
टाकीं अद्रीश्वर मग दणाणोनि गर्जोनि घोर ।
त्या स्कंदाचा प्रियकर असा नाचैवीं तेथ मोर ॥
त्याचें तेथें गळुनि पडलें पिच्छ सौन्दर्यखाणी ।
पुत्रप्रेमें त्यजुनि कमलाँ, ठेवि कर्णी भवानी ॥ ५९ ॥
तेवीं तेथें हरशशिकलातेज फांकोनि, तेणें ।
त्याचे, मेघा, बहु विलसती शुभ्र नेत्रान्त जाणें ॥
मूलश्लोक.
 
२७
 
आराध्यैनं शरवणभवं देवमुलंधिताध्वा ।
सिद्धदूदूर्जलकणभयाद्वीणिभिर्मुक्तमार्गः ॥
व्यालंबेथाः सुरभितनयालंभजां मानयिष्य ।
न्त्रोतोमूर्त्या भुवि परिणतां रंतिदेवस्य कीर्तिम् ॥ ४५ ॥
 
भाषान्तर.
 
आराधोनी शरवणभवा पार्वतीनंदनाला ।
जातां उल्लंघुनि हळुहळूं उत्तरेच्या पथाला ॥
वीणावायें भिजतिल तुझ्या बिंदुनीं या भयानें ।
सिद्धेद्वंवें बघुनि तुजला वाट देतील जाणें ॥ ६० ॥
 
१. पर्वतश्रेष्ठास. २. याचें कर्म 'मोर. ' मेघदर्शनानें मोरांस आनंद
होतो हैं प्रसिद्ध आहे. 3. पडलेलें. ४. फारच सुंदर. ५ ( कानावर
ठेवण्याच्या ) कमलास टाकून पार्वती त्या स्कंदाच्या मोराचें गळून
पडलेलें सुंदर पीस कानावर ठेविते असा अर्थ. ६. शिवाच्या (मस्तका-
वरील) चंद्राच्या कोरीचें तेज. ७. कटाक्ष. ८. शर या नांवाचें तृण
आहे; त्याचें वन ह्मणजे रान; त्यांत जन्म पावणा-या. हे पुढील पदाचें
विशेषण. कार्तिकस्वामीचें जन्म रानांत झालें याविषयी भारतामध्यें
चनपर्वोत कथा सांगितलेली आहे. ९. सिद्धांची जोडपी.