This page has not been fully proofread.

२६
 
मेघदूताचें समवृत्त
 
मित्रा ऐसा पवन गगनामाजि नेईल तूतें ।
वाहोनीया हळुहळु पुढें देव॑पूर्वा गिरीतें ॥ ५७ ॥
मूलश्लोक.
 
तत्र स्कंदं नियतवसतिं पुष्पमेधीकृतात्मा ।
पुष्पासारैः स्नपयतु भवान् व्योमगंगाजलाः ॥
रक्षाहेतोर्नवशशिभृता वासवीनां चमूना- ।
मत्यादित्यं हुतवहमुखे संभृतं तद्धि तेजः ॥ ४३ ॥
 
भाषान्तर.
 
तेथें राहे सतत भगवान् स्कंद, त्यातें पुजाया ।
वर्षावतें करिं सुर्मंमयी कल्पुनी स्वीयकाया ॥
ठेवी तेज प्रखर मुर्खि हें अग्निच्या शूलपाणी ।
रक्षायातें हरिबर्ल, रवीलागि जें लाज आणी ! ॥ ५८ ॥
 
१. ' देवपूर्वा गिरीतें' ह्मणजे देवगिरीतें. देवगिरी शब्द मन्दाक्रान्ता वृ-
त्तांत नीट बसत नाही म्हणून देवपूर्वगिरी असें म्हणणें प्राप्त झालें. उज्जनी
व चंबळानदी यांच्यामध्ये असणाऱ्या एकाद्या डोंगराचें हें नांव असावें असें
क. शा. चिपळूणकर म्हणतात. पूर्वी ज्यास देवगड नांव होतें व हल्लीं ज्या-
स दौलताबाद असें म्हणतात तोच देवगिरि असावा असाहि कित्येकांचा
तर्क आहे. पण तें स्थान उज्जनीच्या दक्षिणेकडे असल्यामुळे व मेघाचा
मार्ग त्या नगरीवरून पुढें उत्तरेकडे गेला असल्यामुळे देवगड हा देवगिरी
नसावा हें अनुमान सयुक्तिक दिसतें. २ कार्तिकस्वामी. ३ वृष्टीतें. ४.
फुलांची. ५. करून. ६. ' हैं (स्कंदरूप) प्रखर तेज शूलपाणी हरिबल
रक्षायातें अग्निच्या मुखिं ठेवी' असा अन्वय. ७. शिव. ८. इन्द्राचें
सैन्य. देवांचें सेनापत्य करण्याकरितां स्कंदाचा अवतार झाला हैं पुराण-
प्रसिद्ध आहे. स्कंदाची उत्पत्ति अनीपासून झाली आहे असें स्कंदपुरा-
णांत आढळतें. तारकासुरानें इंद्राचा पराभव केला तेव्हां इंद्र शिवाला
शरण गेला. शिव प्रसन्न होऊन इन्द्राच्या सैन्याच्या रक्षणार्थ पुत्र
उत्पन्न करावा या हेतूनें पार्वतीशीं रत झाला असतां त्यांचें वीर्य अग्नानें
पक्ष्याचें रूप धारण करून प्राशन केले. यापासूनच पुढे कार्तिकस्वा-
मीचें जन्म झालें. या कथेस अनुलक्षून येथें वर्णन आहे. ९. जें तेज.
मेघ हा इंद्वाचा दूत आहे आणि इंद्राच्या रक्षणार्थ कार्तिकस्वामींचा
अवतार आहे; तेव्हां ते मेघास फारच पूज्य आहेत अशा भावानें यक्षा-
नें, मेघास कार्तिकस्वामीवर पुष्पवृष्टि करण्याविषयी सुचविलें आहे.