This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
मूलश्लोक.
 
तस्याः किंचित्करध्धृतमिव
 
प्राप्तवानीरशाख ।
 
नीत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितंबं ॥
प्रस्थानं ते कथमपि सखे लम्बमानस्य भावि ॥
ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थः ॥ ४१ ॥
 
भाषान्तर•
 
वानीराच्या जणुं धरियलें काय शाखांकरांनीं ।
सोडी तैसें तँटकटिस जें शोभतें नीलवर्णी ॥
घेवोनीया सलिल-वसना त्या तिच्या रंगेशील ।
मोठ्या दुःखें तिजशि, रसिका ! वाटतें सोडिशील ॥ ५५ ॥
मूलश्लोक.
 
त्वन्निष्यन्दोच्छ्रसितवसुधागंधसंपर्करम्यः ।
स्रोतोरंध्रध्वनितसुभगं दंतिभिः पीयमानः ॥
नीचैवीस्यत्युपजिगमिषो र्देवपूर्व गिरिं ते ।
शीतो वायुः परिणमयिता काननोदुंबराणाम् ॥४२॥
 
२५
 
भाषान्तर.
 
त्वत्सेकानें सुखितवसुधा थोर उद्गार टाकी ।
तो लागोनी अधिक सुरंभी होतसे 'जो विलोकीं ॥
शुण्डाग्रांनीं गज करुनिया मंजुलोद्वार ज्यौला ।
आनंदाच्या लहरिंत पहा लागती प्यावयाला ॥ ५६ ॥
वाहोनीया त्वरित पिके॑वी वन्य औदुंबरांना ।
बाँटे भारी सुखकर तसा थंडही इंद्रियांना ॥
 
१. वेताच्या. २. खांद्यारूप हातांनीं. 3. तीररूप कंबरेला. ४. उदक-
रूप वस्त्रास. ५. रममाण होशील. ६. या संबोधनाचें स्वारस्य रसिक
वाचकाच्या सहज लक्ष्यांत येईल. ७. तुझ्या सिंचनानें. ८. बापरूप
उद्गार. ९. सुगंध. १०. जो वायु. ११. सोंडेच्या टोंकांनी. १२. गोड
आवाज. १३. ज्या वायूला. हें 'प्यावयाला ' याचें कर्म. १४. याचा
कर्ता 'जो' अध्याहृत. १५. याचा कर्ता 'जो' अध्याहृत. या
श्लोकांतील संबंधी सर्वनामांचा संबंध 'पवन' या नामाकडे आहे.
 
3