This page has not been fully proofread.

२४
 
मेघदूताचें समवृत्त
 
जाती प्राणेश्वर समजुतसिाठिं त्या खंडितांच्या ।
 
प्रातःकाळीं; त्याजं ह्मणुनिया तूं पथा भास्कराच्या ॥५२॥
नीहाँराथ्रु हरुनि नलिनीपद्मवींवरील ।
 
न्याँया तोही मग निजकरीं त्या दिशेला वळेल ॥
आलासी तूं पथिं जरि तया आडवा अंतरिक्षीं ।
त्याचा मोठा तुजवर तरी राग होईल लक्षीं ॥ ५३ ॥
मूलश्लोक.
 
गंभीरायाः पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने ।
छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम् ॥
तस्मादस्याः कुमुदविशदान्यहसि त्वं न धैथी- ।
न्मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनमेक्षितानि ॥ ४० ॥
 
भाषान्तर.
 
गंभीरेच्या विमलसलिलीं जेविं चित्तीं प्रसन्न ।
मेघा, जात्या सुभग तव तें बिंब बिंवेल पूर्ण ॥
मासे पाण्यामधि उसळतां खालचे भाग त्यांचे ।
वारंवार स्फटिकमणिसे शोभती शुभ्र साचे ॥ ५४ ॥
त्यांच्या रूपें तुजवरि कटाक्षांस फेकील त्यांतें ।
धूर्तत्वानें विफल करणे योग्य नोहेचि तूतें ॥
 
१. नाथ, प्राणवल्लभ. २. साहित्यशास्त्रकारांनी आठ नायिका सां-
गितल्या आहेत. त्यांत खंडिता ह्मणून एक नायिका सांगितली आहे.
दुसऱ्या स्त्रीकडे पति गेला ह्मणून ईर्ष्यायुक्त होणारी जी स्त्री तिला खं-
डिता हैं नांव आहे. ३. वरूप आसवें. ४. कमलवेलीच्या कमलरूप
मुखावरील ५ हरण करण्यास. ६. आपल्या किरणांनीं श्लेषकरून
हस्तांनी या श्लोकांत कमलिनीवर स्त्रीची, तिच्या कमलावर मुखाची
व त्यावरील दुवांवर अभ्रूची कल्पना केली असून सूर्य कमलिनीचा
पति मानून तो आपल्या करांनी तिचे अश्रु पुसण्याकरितां येत आहे
असें वर्णन आहे. ७. गंभीरा नामक नदीच्या. ८. त्या माशांच्या
खालच्या भागांच्या मिषानें गंभीरा नदीत उसळ्या मारणा-या
माशांच्या खालच्या स्वच्छ पोटांवर नदीच्या कटाक्षांची कल्पना
केली आहे. मासे उसळी मारतात तेव्हां त्यांची पोटेंवरती होतात
हें नेहमी दृष्टीस पडतेंच.