This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ
 
भाषान्तर.
 
चोरोनीया दयितंभवना कामिनी जावयाला ।
रात्रीं तेथें निघति बघुनी गाढ अंधार झाला ॥
त्या वेळीं तूं कनकनिकषस्निग्ध ऐशा विजेला ।
मार्गामध्यें चमकवुनिया वाट दावी तयांला ॥ ५० ॥
वर्षोनीया परि करुं नको गर्जना तूं भयाण ।
जातीनें त्या असा अबैला ! हें मनामाजि आण ॥
मूलश्लोक.
 
तां कस्यांचिद् भवनवलभौ सुप्तपारावतायां ।
नीत्वा रात्रिं चिरविलसनात् खिन्नविद्युत्कलत्रः ॥
दृष्टे सूर्ये पुनरपि भवान् वाहयेदध्वशेषं ।
मंदायन्ते न खलु सुहृदामभ्युपेतार्थकृत्याः ॥ ३८॥
 
भाषान्तर•
 
मेघा, जीतें चिरँ विलसुँनी शीण आला नितांत,
ऐशा कांतेसहित रजनी काढ तेथें निवांत ॥
एकाया तूं भवनशिखरीं; राहिली वाट चाल ।
प्रातःकाळीं; सुजन न करी मित्रकार्यास वेळ ॥ ५१ ॥
मूलश्लोक.
 
तस्मिन्काले नयनसलिलं योषितां खण्डितानाम् ।
शांतिं नेयं प्रणयिभिरतो वर्त्म भानोस्त्यजाशु ॥
माया कमलवदनात्सोऽपि हतु नालन्याः ।
प्रत्यावृत्तस्त्वयि कररुधि स्यादनल्पाभ्यसूयः ॥ ३९ ॥
 
भाषान्तर.
 
संकेतातें करुनि रमले अन्य गेहीं स्वकान्त ।
तेणें रागावुनि कारीत ज्या, अंबुढ़ा, अश्रुपात ॥
 
२३
 
१. झालेला. २. सोन्याच्या कसोटीवरील रेषेप्रमाणें सुंदुर. ३ . बल-
हीन, स्त्रिया. ४. फार वेळ. ५. चमकून. ६. स्त्रीसह अर्थात् विजेसह.
७. घराच्या गच्चीवर. ८. रात्रीं भेटेन असा बेत; त्याला.