This page has not been fully proofread.

२२
 
मेघदूताचं समवृत्त
 
लागोनीया जललव तुझे, अंबुदा, थंडगार ।
त्यांच्या अंगस्थित-नख-पदां सौख्य होईल फार ॥
तेणें प्रेमें बघतिल तुला आपुल्या तैं कटाक्षीं ।
ज्यांलागोनी सुरुचिर अँलिश्रेणिचें साम्य लक्षीं ॥ ४७॥
मूलश्लोक.
पश्चादुच्चैर्भुजतरुवनं मंडलेनाभिलीनः ।
सांध्यं तेजः प्रतिनवजपापुष्परक्तं दधानः ॥
नृत्यारंभे हर पशुपतेरार्द्रनागाजिनेच्छां ।
शान्तोद्वेगस्तिमितनयनं दृष्टभक्तिर्भवान्या ॥ ३६॥
 
भाषान्तर•
 
पश्चात् नृत्या करित असतां शंभुँ, त्याच्या भुजास ।
संध्याकाळीं अरुर्णपटलें वेष्टुनी तेथ बैस ॥
त्यायोगानें घडिभरि तरी आर्द्रनाँगाजिनाची ।
त्याची इच्छा, नवजलधरा, पूर्ण होईल साची ॥ ४८ ॥
नोहे नागाजिन, जर्लद हा वेष्टितो स्वप्रियास ।
हें जाणोनी त्यजिल गिरिजी आपुल्या तैं भयास ॥
पाहोनीया शिवपदिं तुझें प्रेम तैसें अपार ।
 
चित्तालागीं नवलहि तिच्या जाण वाटेल फार ॥४९॥
मूलश्लोक.
 
गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं ।
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमाभिः ॥
सौदामिन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वी ।
तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विलवास्ताः ॥ ३७ ॥
 
१. अंगावर वठलेल्या नखांच्या चिन्हांस. २. ज्या कटाक्षांस 3.
फार सुंदर. हें 'अलिश्रेणि' याचें विशेषण. देवस्थानांतून वतनदार
कलावंतिणी असतात त्यांचें वर्णन प्रस्तुत श्लोकांत आलें आहे. ४. भ्रमर-
पंक्तीचें. ५. शंकर. ६ तांबड्या पटलानें. संध्याकाळी सूर्याचे लाल किरण
मेघांवर पडून तेही लाल दिखूं लागतात ह्मणून 'अरुणपटलें ' असें
ह्नटलें आहे. ७. हत्तीच्या ओल्या चर्माची. शिव तांडव करीत असतां
रक्तानें आर्द्र झालेलें हत्तीचें चर्म पांघरतो असें कोठें कोठें वर्णन
आढळतें त्यास अनुलक्षून हें वर्णन आहे. ८. मेघ. ९. पार्वती.