This page has not been fully proofread.

२०
 
मेघदूताचें समवृत्त
 
भाषान्तर.
 
बाला बालां सुकविति तिथें गंधैशाली धुऱ्यांनीं ।
 
त्यांचा जाळ्यांतुनि, जलधरा, धूप जातो निघोनी ॥
तो लागोनी कैश तव तनू पुष्ट होईल फार ।
तूतें नृत्यें रिझवितिल ही पाळिलेले मयूर ॥ ४१ ॥
पुष्पांचा ज्यामधिं मधुरसा दाटला फार वास ।
लाली आली ललितवनितापादरागें जयास ॥
ऐशा नामी बसुनि भवनीं उज्जनीतें बघावें ।
आला मार्ग क्रमण करितां शीण त्यातें हरावें ॥ ४२ ॥
मूलश्लोक.
 
भर्तुः कण्ठच्छविरिति गणैः सादरं वीक्ष्यमाणः ।
पुण्यं यायास्त्रिभुवनगुरोधी मचण्डीश्वरस्य ॥
धूतोद्यानं कुवलयरजोगन्धिभिर्गन्धवत्या- ।
स्तोय क्रीडानिरतयुवतिस्नानतिक्तैर्मरुद्भिः ॥ ३३ ॥
 
भाषान्तर.
 
चण्डीशाच्या विमल भवनालागि मागोनि पाहें ।
त्याला लोकीं सुविदित महाकाल हे नांव आहे ॥
तेथें जातां बघतिल तुला तद्गणं स्वादर्शनें ।
पाहोनीया तब तनु निळी स्वामिर्कण्ठाप्रमाणें ॥ ४३ ॥
येतो नामी परिमल जया पद्मरेणुप्रसंगें ।
 
१. केशांस. २. सुगंध. ३. कृशतनू पुष्ट होईल याचें कारण धूर हा
मेघाचा घटकावयव आहे हैं होय. मूळांत पांचव्या श्लोकांत याचा
उल्लेख आलेला आहे. ४. सुंदर विलासिनी स्त्रियांच्या पायांस
लाविलेल्या अळित्यानें. ५. शंकराच्या ६. महाकालेश्वर. हें स्थान
उज्जयिनीजवळ असून प्रसिद्ध आहे. ७. शिवाचे प्रमथांदि गण.
८. फार आदरपूर्वक. ९. स्वामी जो शंकर त्याच्या कंठाप्रमाणे.
शिवानें कालकूट विष प्राशन केले तेव्हांपासून तो नीलकंठ झाला.
मेघाचाही रंग निळा होता त्यामुळे त्याच्या दर्शनानें शिवदूतांस
स्वामिकंठाच्या प्रभेची भ्रांति होईल अशी कल्पना कवीनें केली आहे.
१०. कमलांतील रजांच्या संसर्गानें.