This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेध.
 
भाषान्तर.
 
प्रयोताची उदयननृपें हारिली येथ कन्या ।
होतें तालँद्रुमवन इथें हैमै त्याचेंचि धन्या ॥
स्तंभालागी उपटुनि मदें लागला तो फिराया ।
येथें मोठा नलॅगिरि करी मोकळा होउनीया ॥ ब ॥
ऐशा गोष्टी वदुनी रिझवी लोक येथें सुजाणा ।
बाहेरोनी इतर जन जे प्राप्त होतात त्यांना ॥
मूलश्लोक. (क्षेपक)
 
पत्रश्यामा दिनकरहयस्पर्धिनो यत्र वाहाः ।
शैलोदग्रस्त्वमिव करिणो वृष्टिमन्तः प्रभेदात् ॥
योधाग्रण्यः प्रतिदशमुखं संयुगे तस्थिवांसः ।
प्रत्यादिष्टाभरण रुचयश्चन्द्रहासव्रणांकैः ॥ ॥
 
भाषान्तर.
 
येथें होती हय रविहयासारिखे श्यामवर्ण ।
गण्डस्राँवें तुजसम करी उँचही वृष्टिमान ॥
लंकेशाशीं समर करिते वीर झुंजार पाहीं ।
ज्यांची भूषाँद्युति मळविली_चन्द्रहासव्रणांहीं ॥ क ॥
मूलश्लोक.
 
जालोद्गीणैरुपचितवपुः केशसंस्कारधूपै- ।
ईन्धुप्रीत्या भवनशिखिभिर्दत्तनृत्योपहारः ॥
हर्म्येष्वस्याः कुसुमसुरभिष्वध्वखेदं नयेथा ।
लक्ष्मीं पश्यंललितवनितापादरागांकितेषु ॥ ३२ ॥
 
१. प्रद्योत या नांवाचा उज्जयिनीचा एक राजा झाला. याची मुलगी
वासवदत्ता. हिची गोष्ट मार्गे आलीच आहे. २. ताल वृक्षांचें वन.
३. सोन्याचें. ४. धन्या मेघा ! ५. हत्तीचें नांव. ६. स्राव, उंच व
वृष्टिमान हे शब्द द्व्यर्थी आहेत. ते मेघ व करी अशा उभयतांस
लागू पडतात. ७. भूषणांचें तेज. ८. रावणाच्या तरवारीचें नांव
चन्द्रहास असें आहे. त्या चन्द्रहासानें पडलेल्या जखमांनी.