This page does not need to be proofread.

समर्पण.

श्लोक.
 

 
( शार्दूलविक्रीडित. )

श्रीमत्व्यंबकपादपंकज जयें आराधिलें अंतरीं

ज्याचें वैभव बुद्धिचें प्रकटलें साहित्यशास्त्रांतरीं ।

ज्याची रम्य नवीन काव्यरचना चित्तास संतोषवी

जो कालोचित भाषणांत अपुलें चातुर्यही दाखवी ॥१॥
 

 
विद्वत्ता, अतिनम्रता, रसिकता यांचा त्रिवेणीपरी

जेथें संगम फार गोड दिसला हे गोष्टि आहे खरी ।

होती वामनमूर्ति कीर्ति परि ती ज्याची बहू लांबली )

वाणी फार रसाळ वाङ्मयतपीं ज्याची सदा रंगली ॥ २ ॥

ज्याचें नांव असे गणेश, पदवी शास्त्री जया लाभली

लेले हें उपनांव लौकिक, सती कांता यशोदा भली ।

त्या तातासि नमूनि लक्ष्मण तथा अर्पीतसे सादर-

प्रेमानें कविराजरम्यकृतिचें हें आजि भाषांतर ॥३॥